राणेंचा मलिकांना इशारा; नको ती मर्यादा ओलांडू नका, भारी पडेल

nilesh rane nawab malik
nilesh rane nawab malik
Published On

सातारा : राज्यातील महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक Nawab Malik यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्या सांगण्यावरुनच ड्रॅग रॅकेट drug racket सुरू आहे असा आरोप केला. त्यावरुन भाजपच्या बहुतांश नेत्यांनी नवाब मलिक यांच्यावर समाज माध्यमातून, माध्यमातून प्रहार सुरु केला आहे. यामध्ये राणे बंधूंनी देखील त्यांची भावना व्यक्त केली आहे. निलेश राणे म्हणतात नवाब मलिक यांचे मानिसक संतुलन बिघडल आहे तर नितेश राणेंनी देवेन्द्रजी "मौके पे चौका" मारणार असे ट्विट केले आहे.

nilesh rane nawab malik
BSNL फुलझडी, बुलेट बाॅम्ब फेस्टिव्ह Offer या तारखेपर्यंत वैध

निलेश राणे म्हणतात नवाब मलिक यांचं मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडलं आहे त्यांना ताबडतोब रूग्णालयात दाखल करा. एका राजकीय नेत्यांबरोबर अनेक लोक फोटो काढतात, असेच आरोप स्वर्गीय आर आर पाटील साहेब व अजित पवार यांच्यावर देखील झाले होते. नवाब मलिक नको ती मर्यादा ओलांडू नका, भारी पडेल.

राणेंच्या या ट्विटला त्यांच्या समर्थकांनी रिप्लाय देताना नवाब मलिक यांचे विचार खालच्या स्तरावरचे आहेत. ते नशेबाज जावयासाठी आटापिटा करीत आहेत. त्यांना एसटी कर्मचारी, सामान्य कामगार, शेतकरी या विषयावर एक चकार शब्द ही बाेलायला वेळ नाही. पण आर्यन, शाहरुख, जावई, वानखेडे यावर फार जोर यांचा, ते देशद्रोही आहेत असे नमूद केले आहे. बहुतांश जण मलिकांवर टीकात्मक, उपासहात्मक ट्विट करीत आहेत.

आमदार नितेश राणे यांनी देखील ट्विट करुन नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. ते लिहितात नवाब नी "hit wicket” केला ... आता देवेन्द्रजी "मौके पे चौका" मारणार.. हम जहां खड़े होते हैं..लाइन वहां से शुरू होती है.. ये याद रखना मलिक!!

दरम्यान भाजपच्या बहुतांश नेत्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नवाब मलिक यांनी केलेले आराेप हे बिनबुडाचे आहेत. हे सरकार ड्रग्ज माफियांचे समर्थन का करीत आहेत असा प्रश्न भाजप नेते विचारु लागले आहेत.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com