Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Nilesh Rane alleges BJP: पैसे वाटपावरून निलेश राणे पुन्हा एकदा आक्रमक झालेत. मतदानाला काही तास शिल्लक असतानाच पोलिसांनी एक गाडी ताब्यात घेतली आणि त्यानंतर पिंपळपारमध्ये सुरु झाला पैसे वाटपावरून आरोप-प्रत्यारोपांचा खेळ. यावेळी राणेंनी नेमके काय आरोप केले? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Nilesh Rane alleges BJP
Nilesh Rane shows cash-filled bags allegedly linked to BJP workers during a midnight raid in Pimpalpar.saam tv
Published On
Summary
  • मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटपाचा निलेश राणेंचा आरोप.

  • मध्यरात्री दोन जणांना पैशांसह पकडण्यात आलं.

  • भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी धाड टाकून पैसे भरलेल्या बॅगा सापडल्याचा आरोप.

निलेश राणेंचा हा संताप आहे. मालवणमधील पैसे वाटपावर. मतदानाला काही तास शिल्लक असताना राणेंनी मध्यरात्री दोन वाजता पैसे वाटप करणाऱ्या दोन व्यक्तींना गाडीतून जाताना पिंपळपार इथे पकडलं. मालवणमधील पैसे वाटपाची प्रकरण अगदी मतदानापर्यंत गाजत राहिली. मालवणची निवडणूक गाजली ती निलेश राणे यांनी भाजपवर केलेल्या पैसे वाटपाच्या आरोंपामुळे भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी धाड टाकून त्यांनी पैश्यांनी भरलेल्या बॅगा समोर आणल्या आणि मतदानाच्या आदल्या रात्री पिपळपारमधलं पैसे वाटप प्रकरण.

Nilesh Rane alleges BJP
Local Body Election: आता थेट निवडणूक आयोगाला कोर्टात खेचणार; निलेश राणेंचा मोठा निर्णय

मालवणच्या पिंपळपारमध्ये मध्यरात्री काय झालं., पाहूयात

भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

मालवणच्या पिंपळपारमध्ये नाकाबंदीदरम्यान कारमधून दीड लाखांची रोकड जप्त

पोलीस आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये गाडी सोडून देण्याबाबत चर्चा

शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणेंना माहिती दिली

आमदार निलेश राणे रात्री 12 वाजता मालवण पोलीस स्टेशनात धडकले

देवगडमधील भाजप पदाधिकाऱ्याची कार असल्याचा निलेश राणेंचा आरोप

Nilesh Rane alleges BJP
'एक नंबर एक नंबरच असतो'; रवींद्र चव्हाणांचा शिंदेंना चिमटा, निवडणूक प्रचारात महायुतीत घमासान

ठोस कारवाईसाठी निलेश राणे आक्रमक,पोलिसांना विचारला जाब

दरम्यान राणेंनी याप्रकरणी निवडणुक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन पिंपळपारमधील प्रकरणी पैसे वाटप करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची आणि न्याय मिळवून देण्याची मागणी केलीय.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे कुटुंबियांचं निर्विवाद वर्चस्व आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत निलेश राणेंच्या वर्चस्वाला धक्का देण्यात विरोधक यशस्वी झाले. नगरपरिषदेतही त्याचीच पुनरावृत्ती होत असल्यानं निलेश राणे आक्रमक झाले आणि मित्रपक्ष असणाऱ्या भाजपवरच त्यांनी आरोपाची राळ उठवली. आता आरोप प्रत्यारोपांच्या आणि वर्चस्वाच्या लढाईत मालवण नगरपरिषदेचा गड कोणाच्या ताब्यात जातो. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com