Maharashtra Politics: सुसंस्कृत भाजपचा असंस्कृत चेहरा; गोपिचंद पडळकरांच्या पातळीहिन वक्तव्यामुळे नवा राजकीय वाद

BJP’s Cultured Image Questioned After Padalkar Remarks: गोपिचंद पडळकरांनी जयंत पाटलांविषयी केलेल्या पातळीहिन वक्तव्यावरुन नवा वाद पेटलाय... यात पवारांसह मुख्यमंत्री फडणवीसांचीही एण्ट्री झालीय.. मात्र पडळकरांनी नेमकं काय वक्तव्य केलं आणि त्याचे कसे पडसाद उमटले?
BJP MLA Gopichand Padalkar’s controversial remarks on Jayant Patil create political uproar as Sharad Pawar confronts CM Fadnavis.
BJP MLA Gopichand Padalkar’s controversial remarks on Jayant Patil create political uproar as Sharad Pawar confronts CM Fadnavis.Saam Tv
Published On

ही सडकछाप भाषा आहे सुसंस्कृत पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपचे असंस्कृत आमदार गोपिचंद पडळकर यांची.... जयंत पाटील यांच्यावर टीका करताना गोपिचंद पडळकरांनी नेहमीप्रमाणे राजकीय टीकेच्या मर्यादा ओलांडल्यात.. त्यामुळे नवा वादंग निर्माण झालाय...

गोपिचंद पडळकरांच्या वक्तव्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटलेत.. तर पवारांच्या राष्ट्रवादीने गोपिचंद पडळकरांविरोधात तीव्र निदर्शनं केलीत.गोपिचंद पडळकरांनी जयंत पाटलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आता शरद पवार आक्रमक झालेत...पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन करुन पडळकरांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केलीय..

पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना फोन करुन पडळकरांची टीका योग्य नसल्याचं म्हटलंय.. एवढंच नाही तर पडळकरांसारख्या बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरण्याचं आवाहन केलंय.. तर पडळकरांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध पवारांनी व्यक्त केलाय..

दुसरीकडे पवारांचा फोन आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी गोपिचंद पडळकरांचे कान टोचलेत.... खरं तर गोपिचंद पडळकरांचा बेताल वक्तव्याची मालिका काही नवी नाही... याआधीही गोपिचंद पडळकरांनी वारंवार वादग्रस्त वक्तव्य केलेत...एवढंच नव्हे तर चक्कं महाराष्ट्राच्या विधीमंडळातही हाणामारी करणारे गुंड कार्यकर्तेही याच गोपिचंद पडळकरांचे होते...

अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, गोपिनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नितीन गडकरी यांच्यासारख्या नेत्यांमुळे भाजपची सुसंस्कृत पक्ष अशी ओळख आहे....मात्र टपोरी गुंडापुंडाकडून गावच्या पारावर वक्तव्य करावीत अशी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाची इभ्रत वेशीवर टांगणारी वक्तव्य पडळकर करत आले आहेत... त्यामुळे महाराष्ट्राची राजकीय सुसंस्कृपणा टिकवून ठेवायचा असेल तर भाजपनं अशा वाचाळ आणि मग्रुर नेत्यांना वेळीच आवर घालायला हवा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com