Richest Indian woman Neha Narkhede : भारतीय लोक आपल्या कामगिरीच्या जोरावर जगभरात आपल्या देशाचा झेंडा फडकवत आहेत. मायक्रोसॉफ्ट, गुगलसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांच्या यशात भारतीयांचाही मोठा वाटा आहे. भारतीय पुरुषांसोबतच भारतीय महिला देखील यात मागे नाही. अनेक विदेशी कंपन्यांत प्रमुख पदांवर पुरुषांप्रमाणेच महिला देखील आहेत. अशीच एक मराठी महिला आहेत नेहा नारखेडे.
नेहा नारखेडे (Neha Narkhede) यांचा जन्म पुण्यात झाला, त्या 38 वर्षांच्या आहेत. त्यांचा नुकताच जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांची स्थापना किंवा त्यांचे नेतृत्व करणाऱ्या भारतीयांच्या यादीत सामावेश झाला आहे. नेहा या स्वबळावर यशस्वी बनलेल्या भारतातील सर्वात तरुण महिला उद्योजिका आहेत. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार (Forbes Report) नेहा यांचा अमेरिकेतील सर्वात श्रीमंत महिलांमध्ये (Richest Indian woman) समावेश झाला आहे.
स्वत:ची कंपनी स्थापन केली
पुण्यात लहानाच्या मोठ्या झालेल्या नेहा नारखेडे यांनी हे यश मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. फोर्ब्सच्या अमेरिकेतील सर्वात श्रीमंत सेल्फ मेड महिलांच्या यादीतही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. नेहा यांनी सॉफ्टवेअर कंपनी कॉन्फ्लुएंट आणि फ्रॉड डिटेक्शन कंपनी ऑसिलेटरच्या सह-संस्थापक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे.
एका वर्षात 8600 कोटी रुपयांचे नुकसान
नेहा याना 2021 मध्ये 8 व्या सर्वात श्रीमंत भारतीय महिला म्हणून खिताब मिळाला. त्याच्या कंपनीच्या ब्लॉकबस्टर IPO च्या बळावर त्यांनी हे यश मिळवलं. त्यांची एकूण संपत्ती अंदाजे 13,380 कोटी रुपये आहे. खास गोष्ट म्हणजे त्यांनी स्वत:ला भारतातील सर्वात तरुण स्वयंनिर्मित महिला उद्योजिका म्हणून कायम ठेवले आहे. 2022 च्या हुरुन रिच लिस्टनुसार त्यांची संपत्ती झपाट्याने कमी होऊन 4,700 कोटी रुपये झाली. एक वर्षाच्या कालावधीत त्यांच्या संपत्तीत अचानक 8,600 कोटी रुपयांची घट झाल्याचं पाहायला मिळालं. (Breaking News)
नेहा नारखेडेच्या करिअरची सुरुवात
नेहा नारखेडे यांचा महाराष्ट्राची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी पुण्यात झाला. त्या लहानाच्या मोठ्याही पुण्यातच झाल्या. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून संगणकशास्त्रात पदवी प्राप्त केली. यानंतर पुढील शिक्षण त्यांनी जॉर्जिया टेक अमेरिका येथून पूर्ण केले. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ओरॅकल या सॉफ्टवेअर कंपनीमधून केली. (Tajya Marathi Batmya)
नेहा यांची संपत्ती किती?
फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये नेहा नारखेडे यांची एकूण संपत्ती 360 दशलक्ष डॉलर होती, जी 2020 मध्ये वाढून 600 दशलक्ष डॉलर झाली. त्यानंतर 2021 मध्ये त्यांची संपत्ती झपाट्याने वाढून 925 दशलक्ष डॉलरवर पोहोचली. परंतु 2022 मध्ये त्यांना 490 दशलक्ष डॉलरचे नुकसान सहन करावे लागले. त्याच्या सध्याच्या संपत्तीचा विचार केला तर ती 520 दशलक्ष डॉलर्स आहे. भारतीय चलनात मोजल्यास त्यांची संपत्ती सुमारे 4 हजार 268 कोटी रुपये एवढी आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.