NCP Vs BJP: 'बावन कुळे सोडा, लाख कुळे आली, तरी नखावरची धूळ उडणार नाही'

'दगडावर डोकं आपटू नका, १९९० सालानंतर शरद पवारांच नाव घेतल्याशिवाय आपल्याला राजकारण करता येणार नाही.'
NCP Vs BJP
NCP Vs BJPSaam TV
Published On

रश्मी पुराणिक -

मुंबई: बावन कुळे सोडा, लाख कुळे आली, तरी नखावरची धूळ पण उडणार नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्यावर केली आहे. बारामतीत आज भाजपच्या संघटनात्मक बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीदरम्यान बावनकुळे यांनी शरद पवारांवर टीका केली होती. या टीकेला आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राष्ट्र निर्माण करण्याचे काम भाजप करत आहे. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) विसर्जन करून २०२४ चा पुढचा खासदार भाजपचाच होणार, तसंच इथल्या कार्यकर्त्यांना अधिकाऱ्यांचा त्रास होत असेल तर फडणवीस यांच्या कानावर घालणार आणि कार्यकर्त्यांचा त्रास दूर करणार, असल्याचंही बावनकुळे म्हणाले होते.

पाहा व्हिडीओ -

बावनकुळेंच्या या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाड म्हणाले, 'दगडावर डोकं आपटू नका, १९९० सालानंतर शरद पवार (Sharad Pawar) नाव घेतल्याशिवाय आपल्याला राजकारण करता येणार नाही. असं विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना उमगलं आहे. त्यामुळेच पवारसांहेबांवर सातत्याने खोटेनाटे आरोप जे कधी सत्यात उतरले नाहीत, ते बेलगाम आणि बेफामपणे करण्यात आले.

त्याचा महाराष्ट्राच्या जनतेवर कुठलाच परिणाम झाला नाही. आजही काहीजण पुन्हा शरद पवार आणि बारामती यांच्याबद्दल बोलत आहेत. गड उध्वस्त करू म्हणून वल्गना करत आहेत. विसर्जन करू म्हणता आहेत अर्थात ते केवळ आपण आणि आपला पक्ष चर्चेत रहावा म्हणूनच बोलत आहेत असं म्हणत आव्हाड यांनी पडळकर आणि बावनकुळे यांच्यावर टीका केली.

NCP Vs BJP
BJP Mission 45 : बारामती जिंकण्यासाठी भाजपची तयारी सुरू; देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'आमच्यासाठी प्रत्येक...'

बारामतीचा (Baramati) गड जिंकून दे, असं साकडं बारामतीच्या मारूतीच्या देवळात जाऊन आज कुणीतरी घातलं. ६० वर्षे प्रत्येक निवडणुकीचा फॉर्म आदरणीय शरद पवार साहेब ह्याच मारूतीच्या समोर उभे राहून नंतर दाखल करतात. आज तो मारुती देवळाच्या बाहेर येऊन हसत हसत विचारत होता.

हे आत्ता आलेले ते कोण होते ? असा टोला देखील आव्हाडांनी लगावला आहे. आज बारामतीमध्ये बावनकुळे यांनी कन्हेरी येथील मारुतीरायाचे दर्शन घेऊन आपल्या दौऱ्याला सुरुवात केली होती यावरुन आव्हाडांनी बावनकुळे यांना टोला लगावला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com