BJP Mission 45 : बारामती जिंकण्यासाठी भाजपची तयारी सुरू; देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'आमच्यासाठी प्रत्येक...'

भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघाताही राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करण्याचा रणनीती आखली आहे. भाजपच्या या रणनीतीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis saam tv
Published On

Devendra Fadnavis News : भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी 'मिशन ४५' अंतर्गत जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने आगामीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध जिल्ह्यात बैठकांचा सपाटा लावला आहे. तसेच भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघाताही राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करण्याची रणनीती आखली आहे. भाजपच्या (BJP) या रणनीतीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केलं आहे.

Devendra Fadnavis
उद्धव ठाकरेंचे अमित शाह यांच्या टिकेला जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, 'गणपती हा बुद्धीदाता...'

भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ जिंकण्याचा निर्धार केला आहे. भाजप आणि शिंदे गट एकत्र लढणार असून बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्याची रणनीती आखली आहे. भाजपच्या रणनीतीची राजकीय वर्तुळाच चर्चा सुरू झाली आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत जिंकण्याचा निर्धार पक्का केला आहे. 'भाजपचे मिशन इंडिया आहे. भाजपचे मिशन महाराष्ट्रात आहे. बारामती महाराष्ट्रात येते, त्यामुळे मिशन महाराष्ट्रात बारामती आहे. आमच्यासाठी प्रत्येक सीट महत्वाची आहे'

Devendra Fadnavis
Shivsena Vs Rana: शिवसेनेची नवनीत राणांवर जहरी टीका; 'एका सी ग्रेड फिल्ममध्ये काम करणाऱ्या...'

देवेंद्र फडणवीस यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीवर भाष्य केलं. 'मी असं सांगितलं की, कुठलीही निवडणूक लढताना आपली निवडणूक शेवटची समजून जेव्हा तुम्ही झोकून देता, त्यावेळेस ती निवडणूक आपल्याला जिंकता येते. हे केवळ एकट्या मुंबई महापालिकाकरीता नव्हतं, तर एकूणच राज्याकरीता होतं'.

प्रसारमाध्यमात आगामी निवडणुकीसाठी शिंदे गट-भाजप-मनसे युतीची चर्चा सुरु झाली आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाष्य केलं. 'मला मजा येते, तेव्हा पतंगबाजी तुम्ही करता. ज्याला जे मनात येईल ते दाखवतो. भाजप आणि शिंदे गट एकत्रित मुंबई महापालिका झेंडा फडकवू'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com