Jayant Patil: राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांच्या अडचणीत वाढ? शिंदे-फडणवीस सरकारकडून सांगली बँकेच्या चौकशीचे आदेश

सहकार विभागाने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौकशीचे पुन्हा आदेश दिले आहेत.
Jayant Patil
Jayant Patil SAAM TV
Published On

>> विजय पाटील

सांगली : नागपूर हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आता जयंत पाटलांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारणर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौकशीवरील स्थगिती उठली आहे.

सहकार विभागाने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौकशीचे पुन्हा आदेश दिले आहेत. बँकेतील नोकर भरती, अनियम कर्जवाटप आणि गैर कारभाराविरोधात चौकशी सुरू होती. पण महाआघाडी सरकारच्या काळात चौकशीला स्थगिती देण्यात आली होती. (Latest Marathi News)

Jayant Patil
Mumbai-Pune Express Way Traffic: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी, गाड्यांच्या लांबच लांब रांगा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेत राष्ट्रवादी काँग्रेस,भाजपा खासदार गट आणि काँग्रेस यांची एकत्रित सत्ता आहे. तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या कार्यकाळात गैर कारभार झाल्याचा आरोप होता.

Jayant Patil
Eknath Shinde: मैं खामोश हुं, क्योंकी सब जानता हूं! विधानसभेत CM शिंदेंची जोरदार बॅटिंग, उद्धव ठाकरेंवर केली सडकून टिका

स्वतंत्र भारत पक्ष यांच्याकडून आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या संचालक मंडळाच्या मागणी नंतर चौकशी सुरू झाली होती. नुकतेच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सहकार मंत्री अनिल सावे यांच्याकडे चौकशीवरील स्थगिती उठवून पुन्हा चौकशीची मागणी केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com