Mumbai-Pune Express Way Traffic: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी, गाड्यांच्या लांबच लांब रांगा

मुंबईहून लोणावळा, महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकणी नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक आपल्या खासगी वाहनाने घराबाहेर पडल्याने महामार्गावर वाहतुकीत वाढ झाली.
Mumbai Pune Express Way
Mumbai Pune Express WaySaam TV

>> दिलीप कांबळे

पुणे : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई परिसरातील हौशी मंडळीची पावलं आपोआप पर्यटन स्थळी वळत आहेत. त्यात पुण्यातील अनेक ठिकाणांना नागरिकांची पहिली पसंती असते. कारण वाहतुकीचा उत्तम पर्यात तिथे उपलब्ध आहे. म्हणूनच की काय मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर शुक्रवारी रात्री ( ८-९ वाजेदरम्यान) मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.

मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात मुंबईवरून पुण्याच्या दिशने येणाऱ्या लेनवर वाहतूक संथ गतीने सुरू आहे. मुंबईहून लोणावळा, महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकणी नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक आपल्या खासगी वाहनाने घराबाहेर पडल्याने महामार्गावर वाहतुकीत वाढ झाली. परिणामी बोरघाटात वाहतूक संथ गतीने सुरू आहे. (Latest Marathi News)

Mumbai Pune Express Way
Pune News: पुण्यातील दोन रस्ते 31 डिसेंबरच्या रात्री पूर्णत: बंद राहणार; हुल्लडबाजीही पडेल महागात

पुण्यात नववर्षांचे सेलिब्रेशन दणक्यात केलं जाणार आहे. कारण राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात रेस्ट्रोबार पहाटे पाच वाजेपर्यंत तर वाईन, बिअर आणि देशी मद्य विक्री दुकाने रात्री साडेदहा ऐवजी रात्री एक वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. त्यामुळे मागील दोन वर्ष असलेल्या बंदीची कसर यावर्षी भरुन निघणार आहे.

Mumbai Pune Express Way
New Year Beauty Look : नवीन वर्षाच्या पार्टीसाठी तयार होताय ? 'या' 5 ब्युटी टिप्स फॉलो करा

पुण्यातील दोन महत्त्वाचे रस्ते बंद राहणार

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता (एफसी रोड) आणि महात्मा गांधी रस्ता (एमजी रोड) वाहनांसाठी बंद राहणार आहेत. पुण्यातील या दोना प्रमुख रस्त्यांवर संध्याकाळी 7 नंतर गर्दीचा आढावा घेतल्यानंतर वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहेत, अशा माहिती पुणे वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com