Baramati : सगळेच चॉकलेटवर गंडतात असं नाही...; राम शिंदेचा रोहित पवारांना टोला

राम शिंदे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत साखर आयुक्तांसह बारामती अॅग्रो लिमिटेड प्रशासनाची उच्च स्तरीय चौकशीची मागणी केली होती.
Ram Shinde Vs Rohit Pawar
Ram Shinde Vs Rohit PawarSaam TV

अहमदनगर : चौकशीला घाबरायचं नसतं, चूक केली तर त्याची शिक्षा भोगायची असते. चॉकलेट वाटून तुम्ही निवडून आलात म्हणंजे लोक सगळे चॉकलेटवरच गंडतात असं नाही, असा टोला राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना लगावला आहे. ते कर्जत येथील कार्यक्रमा नंतर माध्यमांशी बोलत होते.

राज्यातील यंदाचा ऊस गळीत हंगाम १५ ऑक्टोंबरपासून सुरु करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. मात्र, रोहित पवारांशी निगडीत असलेल्या बारामती अॅग्रो साखर कारखान्याने सरकारने दिलेल्या तारखे आधी गळीत हंगाम सुरु केला त्यामुळे हा सरकारच्या आदेशाचा भंग असून या प्रकरणी कारखान्याच्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपा नेते राम शिंदे (MLA Ram shinde) यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली होती. (Baramati Agro Sugar Factory)

पाहा व्हिडीओ -

मात्र, गायकवाड यांनी साखर कारखान्यास क्लिनचीट दिल्यानंतर शिंदे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत साखर आयुक्तांसह बारामती अॅग्रो लिमिटेड प्रशासनाची उच्च स्तरीय चौकशीची मागणी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी शिंदेवर टीका केली होती.

राम शिंदेंनी माझ्यावर कारवाईची मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली. लहानपणी छोटे मुलं चॉकलेटसाठी रडतात, तसं आमचे विरोधक करत असल्याचं पवार म्हणाले होते. तर आता पवारांच्या वक्तव्यावर शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, चौकशीला घाबरायचं नसतं, चूक केली तर त्याची शिक्षा भोगायची असते. चॉकलेट वाटून तुम्ही निवडून आलात म्हणजे लोकं सगळे चॉकलेट वरच गंडतात अस नाही.

Ram Shinde Vs Rohit Pawar
Snake Kiss Viral Video : विषारी किंग कोब्राला केलं किस; थरारक व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

सामाजिक आणि राजकीय जीवनात राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असतात. लोक प्रतिनिधींनी चीडायच नसतं. मी देखील जल संधारण मंत्री होतो. त्याची देखील चौकशी झाली, मी कधीही म्हटलो नाही चौकशी करू नका. परंतु आपलाच कारखाना फक्त हा शेतकऱ्यांचा हिताचा आहे. इतर कारखाने शेतकरी हिताच्या विरोधात नाहीत. त्यामुळे त्यांनी अर्धी चूक मान्य केलेली आहे. कारखाना सुरू होता असंही राम शिंदे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com