Supriya Sule News: सुप्रिया सुळे हक्काचा मतदारसंघ सोडणार; बारामतीऐवजी वर्ध्यातून लोकसभा निवडणूक लढणार?

Supriya Sule Contest Loksabha Election in Wardha : सुप्रिया सुळे यांचं एक वक्तव्य या चर्चेला निमित्त ठरलं आहे.
Supriya Sule
Supriya Sule Saam tv
Published On

Lok Sabha Election 2024:

शरद पवार आणि पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विद्यमान खासदार आहेत. मात्र राजकीय बदलांनंतर बारामतीत लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना तगडं आव्हान मिळण्याची शक्यता वर्तवली जात. दरम्यान आपल्या हक्काचा मतदारसंघ सोडून सुप्रिया सुळे विदर्भातून निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Supriya Sule
MLA Disqualification Case : शिवसेना कुणाची? CM शिंदे, उद्धव ठाकरेंना विधीमंडळ पाठवणार नोटीस, कार्यवाहीला वेग

सुप्रिया सुळे यांचं एक वक्तव्य या चर्चेला निमित्त ठरलं आहे. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांच्या कार्याने पावन झालेल्या वर्ध्यातून निवडणूक लढवायला नक्की आवडेल, असं सूचक वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. वर्धा दौऱ्यावर असलेल्या सुप्रिया सुळे यांनी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. (Political News)

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

वर्धा हा खूप पवित्र असा जिल्हा आहे. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. या पावन भूमीत मला काम करण्याची संधी मला मिळाली तर मला नक्कीच आवडेल. मात्र वर्ध्यातून निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय पक्षच घेईल, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

वर्धा मतदारसंघात सध्या भाजपचे रामदास तडस हे खासदार आहेत. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना वर्ध्यातून लोकसभेच्या मैदानात उतरवण्याचा भाजपचा विचार असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र नेमकं कोण कुठून लढणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.

Supriya Sule
Pankaja Munde: पंकजा मुंडेंच्या मदतीला कार्यकर्ते धावले; १९ कोटींचा GST भरण्यासाठी लाखोंची मदत

रोहित पवारांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना पत्रकारांनी याबाबत विचारणा केली. यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं की, सुप्रियाताई वर्धा लोकसभेबाबत काय म्हणाल्या याची मला कल्पना नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com