मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या टीकेला राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी उत्तर दिलंय. ठाकरे बंधू अजूनही एकत्र आहेत, असं आम्ही म्हटले तर चालेल का? असा प्रश्न करत तटकरे यांनी राज ठाकरेंना उत्तर दिलंय. (Latest News)
राज ठाकरे यांनी मनसे काढली आता प्रदीर्घ कालावधीनंतर ठाकरे एकत्र आहेत, असं आम्ही म्हटलं तर कसं वाटेल यांचे उत्तर राज ठाकरे यांनी द्यावं असं सुनिल तटकरे म्हणालेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या वर्धापनाच्या कार्यक्रमात संबोधित करताना राजकीय स्थितीवर भाष्य केलं होतं. कोण कोणत्या गटात आहे, हेच कळत नाही. राष्ट्रवादी पक्षात फूट पडली नसून हे सर्वजण एक असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
राज्यातील जनतेला फक्त वेडं बनवण्याचं काम केलं जात असल्याचं राज ठकारे म्हणाले होते. राज ठाकरे यांच्या टीकेला राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आज सणसणीत उत्तर दिलंय. आम्ही एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. हा आमचा ठाम निर्णय असून त्यातून आता माघार नाही असं तटकरे म्हणालेत.
ठाकरे बंधू अजूनही एकत्र आहेत, असं आम्ही म्हटले तर चालेल का ?मनसे काढली त्यानंतर आता प्रदीर्घ कालावधीनंतर ठाकरे एकत्र आहेत असं आम्ही म्हटलं तर कसं वाटेल यांचे उत्तर राज ठाकरे यांनी द्यावं, असंही तटकरे म्हणालेत.
काय म्हणाले होते राज ठाकरे
कोण कुठे आहे हेच कळत नसून कुणाचेही नाव घेतलं तर विचारावे लागते कुठे आहे ते? मला नाट्य संमेलनात ५ नगरसेवक भेटायला आले. आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक आहोत’, पण कुणाचे? तर त्यातील ३ म्हणाले आम्ही शरद पवारांचे. तर त्यातील २ जण ‘आम्ही अजित पवारांचे’ असल्याचं सांगितलं. पण मात्र ते सर्व एकत्र आले. माझं अजूनही ठाम मत आहे की सगळे आतून एकच आहेत. फक्त तुम्हाला मूर्ख बनवत आहेत. यांचं आपापसांत राजकारण चालू असल्याचं राज ठाकरे म्हणालेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.