रायगड नगरपंचायतीत राष्ट्रवादी-शिवसेनेची मुसंडी, भाजपची दमछाक

माणगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात सर्व पक्षीय आघाडीने बाजी मारल्याने तटकरेना धक्का बसला आहे.
रायगड नगरपंचायतीत राष्ट्रवादी-शिवसेनेची मुसंडी, भाजपची दमछाक
रायगड नगरपंचायतीत राष्ट्रवादी-शिवसेनेची मुसंडी, भाजपची दमछाकSaam TV
Published On

राजेश भोस्तेकर

रायगड : रायगड जिल्ह्यातील (Raigad District) नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन पक्ष वरचढ ठरले आहे. भाजपला दोन अंकी आकडा गाठताना दमछाक झाली आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस 38, शिवसेना 35, शेकाप 12, काँग्रेस 8, भाजप 6 तर अपक्ष 3 जागांवर निवडून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेने (Shivsena) आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. पोलादपूर, माणगाव, शिवसेना, खालापूर आघाडीकडे, तळा, म्हसळा राष्ट्रवादीकडे तर पाली राष्ट्रवादी, शेकाप आघाडीकडे आली आहे. माणगाव नगरपंचायतमध्ये खासदार सुनील तटकरे याना धक्का बसला आहे. नव्याने निर्माण झालेल्या पाली आणि तळा, पोलादपूर नगरपंचायतवर भाजपला सत्ता आणण्यात अपयश आले आहे.

रायगड नगरपंचायतीत राष्ट्रवादी-शिवसेनेची मुसंडी, भाजपची दमछाक
Pune Breaking: अपहरण झालेला पुण्यातील चिमुकला ८ दिवसांनंतर घरी परतला

जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या 102 जागांसाठी 21 डिसेंबर आणि अनारक्षित जागेवर 18 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. 102 पैकी म्हसळा आणि तळा येथे प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली होती. 100 जागांसाठी आज 19 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून तहसील कार्यालयात मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पाली नगरपंचायत ही नव्याने निर्माण झाली असल्याने त्यावर झेंडा फडकविण्यासाठी सर्वांनीच कंबर कसली होती. भाजपनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र भाजपला फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले. पाली नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप आघाडीने सत्ता काबीज केली.

माणगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात सर्व पक्षीय आघाडीने बाजी मारल्याने तटकरेना धक्का बसला आहे. म्हसळा, तळा नगरपंचायत ही राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेने कडून खेचून आणल्या आहेत. भाजपनेही तळा, म्हसळा, पोलादपूर याठिकाणी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर स्वतः फिरून प्रचार करीत होती. मात्र तिन्ही ठिकाणी भाजपला आपले वर्चस्व सिद्ध करता आले नाही. त्यामुळे जिल्ह्यात भाजपला फक्त सहा जागांवर समाधान मानावे लागले आहे.

रायगड सहा नगरपंचायत निकाल

जिल्ह्यातील सहा नगर पंचायत निवडणूकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची मुसंडी

शिवसेना 35, राष्ट्रवादी काँग्रेस 38, शेकाप 12, काँग्रेस 8, इतर 3, भाजप 6

पोलादपूर

शिवसेना 10, भाजप 1, काँग्रेस 6

तळा

शिवसेना 4, राष्ट्रवादी काँग्रेस 10, भाजप 3

माणगाव

शिवसेना 7, राष्ट्रवादी काँग्रेस 7, शेकाप 1 इतर 2

म्हसळा

शिवसेना 2, राष्ट्रवादी काँग्रेस 13, काँग्रेस 2

खालापूर

शिवसेना 8, राष्ट्रवादी काँग्रेस 2, शेकाप 7

पाली

राष्ट्रवादी काँग्रेस 6, शेकाप 4, शिवसेना 4, भाजप 2, अपक्ष 1

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com