Sangli News : सांगलीत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची बाजी; तासगावात चालला रोहित आर. आर. पाटील यांचा करिष्मा

सांगलीच्या तासगाव कवठेमंकाळ तालुक्यामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर. आर. पाटील यांचा करिष्मा चालला आहे.
Rohit R R Patil
Rohit R R Patil Saam Tv

Gram Panchayat Election Result : सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आत्तापर्यंत आलेल्या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रथम क्रमांकाचा पक्ष झालेला आहे. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायती राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. तर सांगलीच्या तासगाव कवठेमंकाळ तालुक्यामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर. आर. पाटील यांचा करिष्मा चालला आहे. रोहित आर. आर. पाटील यांच्या करिष्म्याची चर्चा राज्यभर सुरू आहे. (Latest Marathi News)

Rohit R R Patil
Nagpur : वारकरी संघटनांचा सुषमा अंधारेंच्या विरोधात आक्रमक पवित्रा; वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांना भेटून केली 'ही' मागणी

सांगलीत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) हा प्रथम क्रमांकाचा पक्ष झालेला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर भाजप असून तिसऱ्या क्रमांकावर स्थानिक आघाडी असून चौथ्या क्रमांकावर काँग्रेस आहे.

पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या शिंदे गटाने उल्लेखनीय कामगिरी केली असून ठाकरे गट मात्र शेवटच्या क्रमांकावर फेकला गेलेला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीला यश मिळालं आहे. तर पालकमंत्री सुरेश खाडे यांचा भाजप पक्ष दुसऱ्या क्रमांकावर जरी असला तरी त्यांच्या मिरज विधानसभा मतदारसंघात भाजपने सर्वाधिक जागा मिळवलेले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस 154 ग्रामपंचायतीमध्ये विजयी झाला आहे तर भाजप 105 ग्रामपंचायतीमध्ये सत्ता मिळवली आहे. स्थानिक आघाड्यांच्या पॅनल नी 87 ग्रामपंचायतीवर सत्ता काबीज केली आहे. तर काँग्रेस 61 ठिकाणी विजयी झाले आहे. शिंदे गट 30 ठिकाणी सत्ता मिळवण्यात यशस्वी झाला आहे. मात्र सांगली जिल्ह्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे गट हा शेवटच्या स्थानावर फेकला गेलेला आहे.

Rohit R R Patil
Gram Panchayat Election Result : रायगडमध्ये शिंदे गटाचा डंका; अलिबागमध्ये शेकापची बालेकिल्ल्यात पिछेहाट

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर या पडळकरवाडी ग्रामपंचायत मध्ये सरपंच म्हणून निवडून आले आहेत. त्यांचा गावात त्यांच्या पॅनल चा एकतर्फी विजय झालेला आहे. तर फॉरेन रिटर्न उच्चशिक्षित यशोधराराजे शिंदे यांचा एकतर्फी विजयी झाला असून त्यांच्या पॅनलमधील सर्व उमेदवार निवडून आले. .

या निवडणुकीत तासगाव कवठेमंकाळ तालुक्यामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर आर पाटील यांचा करिष्मा चालला. त्यांच्या करिष्म्यामुळे तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीने सत्ता काबीज केली आहे. तालुक्यात भाजपला बारा ग्रामपंचायतीत विजय मिळवता आला आहे. खासदार संजय काका पाटील यांना पुन्हा एकदा युवा नेते रोहित पाटील यांच्या गटाने मोठा जोरदार धक्का दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com