Nagpur : वारकरी संघटनांचा सुषमा अंधारेंच्या विरोधात आक्रमक पवित्रा; वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांना भेटून केली 'ही' मागणी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात वारकरी संघटना आणखी आक्रमक झाल्या आहेत.
Eknath Shinde News
Eknath Shinde News Saam Tv

Nagpur News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात वारकरी संघटना आणखी आक्रमक झाल्या आहेत. संतांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात वारकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना भेटून सुषमा अंधारे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. श्रीराम,शंकर आणि हनुमान या हिंदू देवतांवर केलेली वक्तव्य खपवून घेऊ नयेत, अशी मागणी वारकरी संघटनेने नागपुरात मुख्यमंत्र्यांना केली. (Latest Marathi News)

Eknath Shinde News
Dhananjay Munde : बीड ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया; केला 'हा' मोठा दावा

सुषमा अंधारे यांची २००९ सालातील संतांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात केलेली व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या वक्तव्याविरोधात वारकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वारकऱ्यांनी या वक्तव्यावरून सुषमा अंधारे यांच्या विरोधात आंदोलने देखील केली. त्यानंतर आज, मंगळवारी धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या समन्वयाने वारकऱ्यांच्या २० पेक्षा अधिक संघटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) भेट घेतली

वारकऱ्यांच्या संघटनांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन सुषमा अंधारे यांनी संतांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात त्यांच्यावर कारवाई करायला हवी. तसेच हिंदू देवतांवर केलेली वक्तव्य खपवून घेऊ नयेत, अशी मागणी वारकरी संघटनेकडून यावेळी करण्यात आली.

सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांनाही भेटण्याचा आणि आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न वारकऱ्यांनी केला. मात्र, त्यांनी भेट नाकारल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून न्याय मागत असल्याचं मत विश्व वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी व्यक्त केले.

Eknath Shinde News
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंकडून कथित भूखंड घोटाळ्यावरुन मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, नेमकं काय म्हणाले?

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अक्षय महाराज भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी अक्षय महाराज भोसले म्हणाले, 'धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या समन्वयाने वारकऱ्यांनी २० पेक्षा अधिक संघटनांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. सुषमा अंधारे यांच्या विरोधात कारवाई करण्याचे निवेदन दिले. त्याच बरोबर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही आम्हाला भेट नाकारली'.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी भेट नाकारल्यामुळे भोसले महाराजांनी नाराजीही व्यक्त केली. तसेच या पुढे जोपर्यंत सुषमा अंधारेची पक्षातून हकालपट्टी होत नाही, तो पर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मतदान करण्याचा निश्चयही केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com