Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंकडून कथित भूखंड घोटाळ्यावरुन मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, नेमकं काय म्हणाले?

मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप आहेत. या आरोपांनंतरही मुख्यमंत्री पदावर कायम आहेत. त्यामुळे या प्रकरणात हस्तक्षेत होऊ शकतो.
uddhav thackeray
uddhav thackeray saam tv

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नागपुरातील भूखंड घोटाळ्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. याबाबत आता उद्धव ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप आहेत. या आरोपांनंतरही मुख्यमंत्री पदावर कायम आहेत. त्यामुळे या प्रकरणात हस्तक्षेत होऊ शकतो, असं उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) म्हटलं.

uddhav thackeray
Video : मुख्यमंत्र्यांच्या भूखंड घोटाळ्यावरील स्पष्टीकरणावर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया; जितेंद्र आव्हाड म्हणाले...

उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, एवढा जुना विषय एवढी वर्ष कोर्टात सुरु होता आणि कोर्टाने स्थगिती दिली. ज्या गोष्टीला न्यायालयाने स्थगिती दिली, ती देताना न्यायालयाने म्हटलं की विषय न्यायप्रविष्ठ असताना सरकारने यात हस्तक्षेप केला आहे. ज्या खात्याचा हा विषय आहे त्या खात्याचे मंत्री अजूनही पदावर कायम आहेत, तसेच ते राज्याचे मुख्यमंत्री देखील आहेत. (Latest Marathi News)

त्यामुळे सरकारकडून कशी बाजू मांडायची यात यंत्रणेवर दबाव येऊ शकतो. चौकशी पारदर्शक व्हावी यासाठी चौकशीदरम्यान मंत्रीपदाचा राजीनामा देतात. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा राजीनामा दिल्याचं याआधी घडलं आहे. त्यामुळे चौकशी होईपर्यंत कुणीही पदावर राहू नये. कायद्यानुसार काम झालं असेल तर कोर्टाने स्थगिती का दिली हे देखील प्रश्न आहे, असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर काय आहे आरोप?

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आरोप करतान म्हटलं की, एनआयटीने झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ही जमीन संपादित केली. नंतर त्यावरून वाद सुरू झाला. खोटी कागदपत्रे बनवली गेली. मग ही जमीन ज्याची होती त्याला परत दिली गेली.

पुढे सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम. एन गिलानी यांची समिती नेमली गेली. त्या समितीच्या चौकशीत या प्रकरणातील खोटेपणा आणि चुकीच्या बाबी समोर आल्या. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना काही विकासक एकनाथ शिंदे यांना भेटले आणि शिंदे यांनी तातडीने निर्णय घेत हे भूखंड 16 जणांना अवघ्या 2 कोटींत देऊन टाकले. या भूखंडांची किंमत 100 कोटींपेक्षा अधिक असतानाही कमी किमतीत हे भूखंड वाटले गेले. सध्या नागपूर खंडपीठाने भूखंड वितरणासंबंधीत शिंदे यांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com