Solapur News : माेर्चानंतर मोहोळच्या आमदारांनी जिल्हा परिषद सदस्यांसह तहसील कार्यालयात छेडलं ठिय्या आंदाेलन; जाणून घ्या कारण

अचानक ठिय्या आंदाेलन झाल्याने प्रशासनाचा गाेंधळ उडाला.
solapur, mohol tashildar
solapur, mohol tashildarsaam tv

Solapur News : मोहोळ (mohol) तालुक्यातील बंधारे पाण्याने भरून द्यावेत या मागणीसाठी आज (साेमवार) मोहोळचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार यशवंत माने (ncp mla yashwant mane) आणि जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील (balraje patil) यांचे नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मोहोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जाेपर्यंत बंधाेर भरुन दिले जात नाहीत ताेपर्यंत उठणार नाही असा इशारा देत माेर्चेकर-यांनी तहसील कार्यालयात ठिय्या मांडला. अखेर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंधारे भरून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर माेर्चेक-यांनी आंदोलन स्थगित केले.  (Maharashtra News)

solapur, mohol tashildar
Karjat Krushi Utpanna Bazar Samiti News : राम शिंदे-रोहित पवारांमध्ये मोठी चुरस: दोन्ही गटाला समान जागा; कर्जत बाजार समितीसाठी फेर मतमोजणी सुरू

राज्यात नवीन आलेल्या सरकारमुळे मोहोळ तालुक्यातील जनतेला पाण्यापासून वंचित राहावं लागत आहे. टेल टू हेड पाणी वाटपाची पद्धत असताना हेड टू टेल पाणी वाटप केलं जात आहे. मोहोळ तालुक्यातील शेती पिंपाची वीज बंद करून माढा तालुक्याला पाणी पळवलं जात आहे.

solapur, mohol tashildar
Gautami Patil Viral Video : एकाला पप्पी..., गौतमीच्या चाहत्यांना दांडक्याचा प्रसाद (पाहा व्हिडिओ)

या निषेधार्थ मोहोळचे एनसीपीचे आमदार यशवंत माने आणि जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. खूद्द आमदार आणि जिल्हा परिषद सदस्यांनी आंदाेलन छेडल्याने प्रशासनाची धावपळ झाली.

त्यातच जाेपर्यंत बंधाेर भरुन दिले जात नाहीत ताेपर्यंत उठणार नाही असा इशारा देत माेर्चेकर-यांनी तहसील कार्यालयात ठिय्या मांडला हाेता. अखेर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंधारे भरून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर माेर्चेक-यांनी आंदोलन स्थगित केले.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com