MLA Kiran Lahamate: NCP आमदार किरण लहामटेंच्या कारला भीषण अपघात, विटे घाटात ट्रकने दिली धडक

MLA Kiran Lahamate Car Accident: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण लहामटेंच्या कारला भीषण अपघात झाला आहे. विटे घाटामध्ये ही घटना घडली. भरधाव ट्रकने आमदारांच्या कारला धडक दिली.
MLA Kiran Lahamate: NCP आमदार किरण लहामटेंच्या कारला भीषण अपघात, विटे घाटात ट्रकने दिली धडक
MLA Kiran Lahamate Car AccidentSaam Tv
Published On

सागर आव्हाड, पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. अहिल्यानगरमधील अकोलो तालुक्यातील विठे घाटात त्यांच्या कारला अपघात झाला. भरधाव ट्रकने आमदाराच्या कारला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये आमदार किरण लहामटे थोडक्यात बचावले.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांच्या कारला अपघात झाला. अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील विठे घाटात त्याच्या कारचा भीषण अपघात झाला. किरण लहामटे हे अकोले येथून राजूरकडे जात होते. त्याचवेळी विठे घाटात त्यांची कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या कारमध्ये आमदार लहामटे यांच्याबरोबर त्यांचे स्वीय सहाय्यक आणि कार्यकर्ते होते.

MLA Kiran Lahamate: NCP आमदार किरण लहामटेंच्या कारला भीषण अपघात, विटे घाटात ट्रकने दिली धडक
Pune NCP: सुप्रियाताई, साहेबांची इच्छा पूर्ण करा, राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यासाठी पुण्यात झळकले बॅनर

या अपघातामध्ये आमदार किरण लहामटे यांच्या पायाला दुखापत झाली. दैव बलवत्तर म्हणून आमदार लहामटे थोडक्यात बचावले. सुदैवाने अपघातामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. या अपघातामध्ये आमदाराच्या कारच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले. जखमी झालेल्या आमदार लहामटे यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. याठिकाणी प्राथमिक उपचार करुन त्यांना राजूरी येथील निवासस्थानी नेण्यात आले.

MLA Kiran Lahamate: NCP आमदार किरण लहामटेंच्या कारला भीषण अपघात, विटे घाटात ट्रकने दिली धडक
Sambhajinagar accident : संभाजीनगरात तिहेरी अपघात, ई-बस, आयशर आणि ट्रकची जोरदार धडक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com