jitendra awhad
jitendra awhad saam tv

मेडिकल टेस्टनंतर आव्हाड पुन्हा पोलीस ठाण्यात; समोर आली 'ही' महत्वाची माहिती

सिव्हिल रुग्णालयातून तपासणी केल्यानंतर ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्यात पुन्हा त्यांना पोलिसांना समवेत आणण्यात आले आहे.
Published on

Jitednra Awhad News : सध्या 'हर हर महादेव' या मराठी सिनेमाच्या वादावरून अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलीस ठाण्यातून सिव्हिल रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यासाठी नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर जितेंद्र आव्हाडांच्या आरोग्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. सदर मेडिकल टेस्टनंतर जितेंद्र आव्हाड यांना उच्च दाबाचा त्रास असल्याचे समोर आले आहे. सदर बाब मेडिकल टेस्टमध्ये आढळून आली आहे. सिव्हिल रुग्णालयातून तपासणी केल्यानंतर ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्यात पुन्हा त्यांना पोलिसांना समवेत आणण्यात आले आहे. (Latest Marathi News )

jitendra awhad
Breaking: जितेंद्र आव्हाडांच्या समर्थकांवर पोलिसांचा सौम्य लाठीमार

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलीस ठाण्यातून ठाण्यातील सिव्हिल रुग्णलायात मेडिकल टेस्टसाठी नेण्यात आले होते. यावेळी पोलिसांच्या दोन गाड्या नेण्यात आल्या होत्या. यावेळी एका वाहनात आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra Awhad) होते. तर दुसऱ्या वाहनात जिल्हाप्रमुख आनंद परांजपे होते. मेडिकलसाठी घेऊन जात असतना कार्यकर्त्यांनी दुचाकी आणि चारचाकी वाहने घेऊन आव्हाडांचा पाठलाग केला. त्यावेळी भर रस्त्यावर पाठलाग करत असताना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

jitendra awhad
Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांकडून अटक, ठाण्यात मॉलमध्ये प्रेक्षकाला झाली होती मारहाण

ठाण्यातील शासकीय रुग्णालयात मेडिकल टेस्टनंतर जितेंद्र आव्हाड यांना पुन्हा वर्तक नगर पोलीस स्टेशन या ठिकाणी आणण्यात आले. पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांनी आव्हाडांना हात दाखवले. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर आव्हाडांच्या मेडिकल टेस्टमध्ये उच्च दाबाचा त्रास आढळून आला आहे.

आव्हाड समर्थक पोलिसांच्या ताब्यात

राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ मुंब्रा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. यावेळी पुणे, नवी मुंबई येथून ठाणे भिवंडी आणि भिवंडी ठाणे येथून नवीमुंबई, पुणे या ठिकाणी जाणाऱ्या दोन्ही बाजूच्या गाड्या कार्यकर्त्यांनी अडवून धरल्या होत्या. यावेळी पोलिसांकडून घटना स्थळी धाव घेत कार्यकर्त्यांना बाजूला केले आणि वाहतूककोंडी सोडवली. यावेळी आंदोलनकर्त्या महिलांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com