राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी अटींचा अडथळा, कोणत्या अटींमुळे रखडलं विलिनीकरण?

Ncp Merger Stuck Over Ajit Pawar Faction: राष्ट्रवादीचं विलिनीकरण अटी शर्तींमध्ये अडकण्याची शक्यता आहे...कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नव्या अटी टाकल्याने विलिनीकरणात अडथळा आलाय. खासदार सुनील तटकरेंनी शरद पवारांना आव्हान दिलंय.
Uncertainty looms over the NCP merger as leadership and alliance conditions spark political deadlock.
Uncertainty looms over the NCP merger as leadership and alliance conditions spark political deadlock.Saam Tv
Published On

अजित पवारांच्या मृत्यूला 8 दिवस झाले... सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली... त्यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची सुत्रं देण्याच्या हालचालीही सुरु झाल्या... मात्र एक प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे... तो म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण ... आता या वादात दादांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांनी उडी घेत विलिनीकरणावर भाष्य केलंय.. आता आत्राम विलिनीकरणाबाबत सकारात्मक वक्तव्य करुन थांबले नाहीत... तर त्यांनी विलिनीकरणासाठी पवारांच्या राष्ट्रवादीपुढे 3 महत्वाच्या अटी-शर्ती ठेवल्यात..

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास सुनेत्रा पवारांकडे नेतृत्व द्यावं

पवारांच्या राष्ट्रवादीनं विलिनीकरणानंतर घड्याळ हेच पक्षचिन्ह स्वीकारावं

एवढंच नाही तर विलिनीकरणानंतर एनडीएसोबत राहावं लागणार

आता दादांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या दाव्यांमुळे विलिनीकरणावरून मोठा पेच निर्माण झालाय... हे कमी होतं की काय.... सुनील तटकरेंनीही थेट पवारांच्या राष्ट्रवादीला विलिनीकरण हवं असेल तर पवारांच्या राष्ट्रवादीनं एनडीए सोबत यावं, असा सल्ला दिलाय..

मात्र याच भूमिकेमुळे पवारांच्या राष्ट्रवादीची आणखीच कोंडी होण्याची शक्यता आहे..

विलिनीकरणानंतर सुनेत्रा पवारांच्या हाती सुत्रं गेल्यास पवारांची भूमिका काय?

सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्षा झाल्यास सुप्रिया सुळेंना रोल काय?

पवारांच्या राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांचं पुनर्वसन कसं केलं जाणार?

एनडीएसोबत सत्तेत गेल्यास काँग्रेसी विचाराचा नेता, या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता

पवारांची कोंडी करण्यासाठी दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अटी-शर्तीचं घोडं पुढं केलंय... त्यामुळे पवार दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन पावलं मागे जात विलिनीकरणाचा निर्णय घेणार की विलिनीकरण अटी शर्थींच्या कचाट्यात सापडून थंड बस्त्यात जाणार.... याकडे राज्याचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com