पार्थ पवार बनणार राष्ट्रवादीचे अध्यक्ष? दादांच्या निधनानंतर मिळणार मोठी जबाबदारी?

Parth Pawar Next Ncp National President: राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल नाही तर पार्थ पवारांची निवड होण्याची चर्चा रंगलीय. त्याचे संकेत सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारताना दिसून आलेत.मंत्रालयात नेमकं काय घडलं ?
Parth Pawar seen beside Deputy CM Sunetra Pawar during oath ceremony, sparking speculation over NCP leadership change.
Parth Pawar seen beside Deputy CM Sunetra Pawar during oath ceremony, sparking speculation over NCP leadership change.Saam Tv
Published On

अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण? याची चर्चा रंगली.. अनेकांनी सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याची मागणी केली.. मात्र आता राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा तिढा सुटणार का...आणि राष्ट्रीय अध्यक्षपद ही दादांच्याच घरात येणार का...असं आम्ही म्हणण्याचं कारण म्हणजे .. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारताना समोर आलेल हे दृश्य....

हा व्हिडीओ नीट पाहा.... सुनेत्रा पवार पदभार स्वीकारताना पार्थ पवार त्यांच्या मागे उभे राहिले... त्यावेळी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंसह राष्ट्रवादीचे नेते उभे राहिले... एवढंच नाही तर पटेलांनी पार्थ पवारच राष्ट्रीय अध्यक्ष होतील, याचे संकेत या कृतीतून दिलेत...

होय...सुनेत्रा पवार पदभार स्वीकारताना पार्थ पवारांसाठी स्वतंत्र खुर्ची मागवण्यात आली... आणि ती खुर्ची सुनेत्रा पवारांच्या शेजारीच ठेवण्यात आली... त्यातून पार्थ पवारांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी येण्याचे संकेत मिळालेत...अजित दादांच्या मृत्यूनंतर सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ असो वा कुटुंब म्हणून पवारांसोबतच्या भेटीतून पार्थ पवार सक्रीय होते.. एवढंच नाही तर पार्थ पवारांच्या राज्यसभेवर नियुक्ती करण्याला भाजपने विरोध केल्याची चर्चा रंगली होती.. मात्र आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पार्थ पवारांवर मोठ्या जबाबदारीचे संकेत दिलेत.. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकारणीच्या बैठकीत पार्थ पवार यांच्या हाती राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अध्यक्षपद सोपवलं जाणार की सुनेत्रा पवारच उपमुख्यमंत्रिपदासोबत पक्षाची धुराही सांभाळणार... याकडे देशाचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com