Eknath Khadse News : भुसावळ-बोदवड शेतकी संघाच्या निवडणुकीत खडसेंना मोठा धक्का

Eknath Khadse : भुसावळ आणि बोदवड शेतकी संघाची निवडणुकीत एकनाथ खडसे आणि माजी आमदार संतोष चौधरी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीत भाजपचा पराभव होणार असल्याची चर्चा सगळीकडे होती. पण भाजपने यात विजय मिळवलाय.
Eknath Khadse
Eknath Khadse Saam Tv
Published On

Bhusawal Bodwad Farmers Sangh elections :

भुसावळ आणि बोदवड शेतकी संघाची निवडणुकीत एकनाथ खडसेंना त्यांच्या बालेकिल्ल्यातच धक्का बसलाय. खडसेंच्या बाल्लेकिल्ल्यात भाजपनं गुलाल उधळलाय. भुसावळ आणि बोदवड शेतकी संघाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत संजय सावकारे यांच्या पॅनलनं बाजी मारली. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसलाय. भाजपनं १५ पैकी ११ जागांवर दणदणीत विजय मिळवला.(Latest News)

या निवडणुकीत एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि माजी आमदार संतोष चौधरी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. खरंतर या निवडणुकीत भाजपचा पराभव होणार असल्याची चर्चा सगळीकडे होती. पण भाजपनं जीवाची बाजी लावली आणि अशक्य असलेला विजय आपल्या हातात खेचून आणला. त्यामुळं खडसेंना त्यांच्याच होम ग्राऊंडवर मोठा धक्का बसलाय. या विजयामुळं आगामी निवडणूक सोपी जाणार असल्याचं आमदार (MLA Sanjay Savkari) संजय सावकारी यांनी म्हटलंय. या दणदणीत विजयानंतर भाजपनं गुलाल उधळत फटाके फोडले.

Eknath Khadse
BJP च्या निशाण्यावर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते Eknath Khadse,नेमकं प्रकरण काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com