Eknath Khadse News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच्या बैठकीत महाराष्ट्राच्या खासदारांसमोर '२०१४ साली शिवसेनेने युती तोडली, असं वक्तव्य केलं. नरेंद्र मोदी यांचं वक्तव्याचं राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी खंडन केलं आहे. ' काल नरेंद्र मोदींनी सांगितलं, ते सत्य नाही, असा खुलासा एकनाथ खडसे यांनी शिवसेना-भाजप युती तुटण्यावर केलं आहे. (Latest Marathi News)
एकनाथ खडसे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत खडसे यांनी पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचं खंडन केलं. एकनाथ खडसे म्हणाले, 'काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीच्या खासदारांची बैठक आयोजित केली होती. खासदारांना २०१४ ला शिवसेनेने युती तोडली. आम्ही तोडली नाही असे म्हणाले. मात्र, नरेंद्र मोदी जे बोलले ते अर्ध सत्य बोलले'.
'मी त्यावेळेस विरोधी पक्षनेता होतो, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात वातावरण झालं होतं, त्यावेळेस भाजप-सेनेचे सरकार येईल, असा विश्वास आम्हाला होता. त्यावेळेस अनेक लोक भाजपमध्ये यायला लागले होते, तिकीट मागायला लागले होते. तेव्हा भाजपने एकट्याने निवडणुका लढवाव्या असं मत झालं. त्यानंतर 2 अडीच महिन्यापूर्वी हा निर्णय झाला आणि भाजपने युती तोडली, असे खडसे म्हणाले.
'सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस आणि मीही होतो. त्यावेळेस हे कोणी आणि कसं सांगावं, यावर आमच्यात खल झाला. मला त्यावेळेस मुंबईला तातडीने बोलावलं, देवेंद्र फडणवीस हे त्यावेळी अध्यक्ष होते. त्यांनी ही घोषणा करायला पाहिजे. मात्र, त्यावेळेस माझ्यावर जबाबदारी सोपवली. त्यामुळे मी उद्धव ठाकरे यांना फोनकरून सांगितलं, की त्यावेळेस जागा वाटपावरून जमत नसल्याचे कारण सांगून मी युती तोडली, असे खडसे म्हणाले.
'युती तोडल्यानंतर देसाई आणि सावंत आले होते, युती तोडू नका म्हणून सांगितलं. तेव्हा मी सांगितले की, हा माझा नाही पक्षाचा निर्णय होता. मात्र,काल नरेंद्र मोदींनी नरेंद्र मोदींनी जे सांगितले, ते सत्य नाही, असेही ते म्हणाले.
'भाजपचे वातावरण देशात होते म्हणून अधिकच्या जागा मिळाव्या म्हणून युती तोडली. आपली सत्ता येईल असा विश्वास वाटला होता म्हणून युती तोडली असावी. मला काय वाटत होतं याच्यापेक्षा पक्षाला काय वाटत होतं हे महत्वाचे नाही. पण तेव्हा मला बदनाम केलं, असा आरोपही खडसे यांनी केला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.