Nashik Graduate election
Nashik Graduate electionSaam Tv

Nashik Graduate election : शुभांगी पाटील यांच्या प्रचारासाठी भुजबळ मैदानात; पक्षाचा पाठिंबा केला जाहीर

शुभांगी पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ देखील मैदानात उतरले आहेत.
Published on

Nashik Graduate election : नाशिक पदवीधर निवडणुकीकडे राज्यातील साऱ्यांचे लक्ष लागले आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत शुभांगी पाटील यांनी महाविकास आघाडीच्या पाठिंबाच्या जोरावर प्रचाराचा जोरदार धडाका लावला आहे. शुभांगी पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ देखील मैदानात उतरले आहेत. (Latest Marathi News)

Nashik Graduate election
Pathaan Controversy : शाहरुखच्या 'पठान' विरोधात हिंदूराष्ट्र सेना आक्रमक; तुळजापुरात चित्रपटाचे पोस्टर फाडले

महाविकास आघाडीच्या नाशिक (Nashik) पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी भवन येथे बैठक झाली.

या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले, 'शुभांगी पाटील या आमच्या उमेदवार आहे. काही दिवस मी नाशिकला येऊ शकलो नाही. परंतु कामाला सुरुवात झाली आहे.' या बैठकीत काँग्रेसचे नेते उनुपस्थित होते. त्यावर भाष्य करताना भुजबळ म्हणाले, 'प्रत्येक जण आपापली बैठक घेत आहे. तिन्ही पक्ष काम करत आहे'.

छगन भुजबळ यांनी यावेळी सत्यजित तांबे यांच्यावर निशाणा साधला. 'काँग्रेस म्हटल्यानंतर सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, नाना पटोले ही खरी काँग्रेस आहे. सगळ्यांना माहीत आहे, खरे उमेदवार कोण आहे ? या निवडणुकीत वंचित आघाडी सोबत बोलण्याचे काम उद्धव ठाकरे करतील, असे भुजबळ पुढे म्हणाले.

Nashik Graduate election
Eknath Shinde : राज्यात अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकारचं महत्वाचं पाऊल; मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' आदेश

'शुभांगी पाटील देखील अगोजर तिकडे होत्या. भाजपची भिस्त आमच्या तिन्ही पक्षांवर आहे. तिकडचे अनेक आमदार इकडेचच आहेत, असा टोला भुजबळ यांनी लगावला.

दरम्यान, राष्ट्रवादी जयंत पाटील यांनी पहाटेचं सरकार ही शरद पवारांची खेळी असे वक्तव्य केलं, त्यानंतर जयंत पाटील यांनी वक्तव्यावरून घुमजाव केला. यावर भुजबळ म्हणाले, 'मी या खेळांमध्ये कच्चा आहे, त्यामुळे मला माहीत नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com