Pathaan Controversy : शाहरुखच्या 'पठान' विरोधात हिंदूराष्ट्र सेना आक्रमक; तुळजापुरात चित्रपटाचे पोस्टर फाडले

उस्मानाबादच्या तुळजापुरातही 'पठान'विरोधात हिंदुराष्ट्र सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे
Pathaan Controversy
Pathaan ControversySaam tv
Published On

कैलास चौधरी

उस्मानादाबाद : शाहरुख खानचा 'पठान' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरही वाद सुरूच आहे. अनेक राज्यांत शाहरुख खानच्या चित्रपटाला विरोध होत आहे. महाराष्ट्रातही हिंदुत्ववादी संघटना शाहरुखच्या 'पठान' सिनेमाविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. उस्मानाबादच्या तुळजापुरातही 'पठान'विरोधात हिंदुराष्ट्र सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. (Latest Marathi News)

Pathaan Controversy
Gandhi Godse Ek Yudh Controversy: 'गांधी गोडसे एक युद्ध' वादावर एआर रेहमान यांची प्रतिक्रिया, म्हणाले, 'निर्मात्यांवर विश्वास नाही...'

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि दीपिका पदुकोणचा 'पठान' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. शाहरुखचा हा पठान चित्रपट चांगलाच वादात सापडला आहे. राज्यभरात 'पठान' चित्रपटाविरोधात आक्रमक भूमिका घेतली जात आहे. उस्मानाबादच्या तुळजापूरमध्येही 'पठान' सिनेमाविरोधात पडसाद उमटले आहे.

उस्मानाबादच्या तुळजापूर (Tuljapur) येथील जवाहर थिएटर्स येथे सुरू असलेल्या पठान चित्रपटाचे पोस्टर फाडले आहे. हिंदुराष्ट्र सेनेने हे पोस्टर फाडले आहे. राज्यातील इतरही काही ठिकाणी पठान चित्रपटाला कडाडून विरोध केला जातो आहे.

तुळजापुरात पठान सिनेमाविरोधात हिंदुराष्ट्र सेना आक्रमक झाली असून थिएटर समोरच पाकिस्तान विरोधी आणि शाहरूख खान विरोधी घोषणाबाजी करण्यात आली आहे.

Pathaan Controversy
Padma Awards 2023: मनोरंजन आणि कला क्षेत्रातील 'या' दिग्गजांना जाहीर झाला पद्म पुरस्कार

शाहरुखचं दमदार कमबॅक, 'पठान'ची पहिल्याच दिवशी रेकॉर्डतोड कमाई

शाहरुखच्या पठानने PVR मध्ये 11.40 कोटी, INOXमध्ये 8.75 कोटी, Cinepolis मध्ये 4.90 कोटींचं कलेक्शन केलं आहे. अशाप्रकारे पठानने आतापर्यंत या थिएटर चेनमधून 25.05 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या कलेक्शनचे हे आकडे रात्री 8.15 वाजेपर्यंतचे आहेत.

'वॉर'ने पहिल्या दिवशी 19.67 कोटी रुपये, 'ठग्स ऑफ हिंदुस्तान'ने 18 कोटी आणि 'केजीएफ'ने 22.15 कोटी रुपये कमावले होते. अशा प्रकारे पठानने पहिल्याच दिवशी या चित्रपटांचा विक्रम मोडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com