Padma Awards 2023 announced: प्रजासत्ताक दिनानिमित्त यंदाच्या पद्म पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पद्म पुरस्काराच्या पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा तीन श्रेणी आहेत. दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त या पुरस्कारांची घोषणा केली जाते. यावर्षी देखील मनोरंजन आणि कला क्षेत्रातील अनेक कलाकारांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनला तिच्या चित्रपटांमधील महत्त्वपूर्ण योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रवीनाने 'मोहरा', 'अंदाज अपना अपना', 'KGF 2' आणि 'दुल्हे राजा' सारखे सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
'RRR' मधील 'नाटु नाटु' या गाण्याचे संगीतकार एमएम कीरवानी यांना संगीतविश्वातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कीरवानी यांनी नुकताच गोल्डन ग्लोब जिंकला आहे. कीरवानी यांना 95 व्या अकादमी पुरस्कारांमध्येही नामांकन मिळाले आहे आणि ते ऑस्करच्या शर्यतीत आहे.
देशातील महान तबलावादक आणि संगीतकार झाकीर हुसेन यांनाही पद्मविभूषणने देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांनी अनेक चित्रपटांतून आपल्या तबल्याची जादू दाखवली आहे. त्यांना 1988 मध्ये पद्मश्री आणि 2002 मध्ये पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे.
गायिका सुमन कल्याणपूर यांना देखील पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे. 1954 पासून त्या कार्यरत आहेत. त्याने 'नूरजहाँ', 'पाकीजा', 'दिल एक मंदिर'सह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.
गायिका वाणी जयराम यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. वाणी यांनी हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, उडिया आणि राजस्थानी अशा अनेक भाषांमध्ये 10 हजाराहून अधिक गाणी गायली आहेत.
गझल गायक अहमद हुसेन आणि मोहम्मद हुसेन यांना देखील पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे. अहमद हुसेन आणि मोहम्मद हुसेन, 71 आणि 69 वर्षांचे आहेत. दोघेही 5 दशकांहून अधिक काळ सक्रियपणे गझल सादर करत आहेत आणि शिकवत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.