Chhagan Bhujbal Corona Positive : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

Chhagan Bhujbal Health : छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण
chhagan bhujbal
chhagan bhujbal saam tv
Published On

मुंबई - महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या विषाणूचा फटका सर्वसामांन्यांपासून, बॉलिवूड कलाकार, मालिका विश्वातील अभिनेते-अभिनेत्री तसेच बड्या नेत्यांना देखील बसला आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे.  (Latest Marathi News)

chhagan bhujbal
Jalgaon Accident News: वडिलांचे श्राद्ध घालण्यापूर्वीच वकील मुलाला मृत्‍यूने गाठले; शहरातील रस्‍त्‍यावर कंटेनरने चिरडले

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना काल ताप आल्यानंतर त्यांनी आपली कोरोना चाचणी केली होती. त्यावेळी त्यांची कोरोना (Corona) चाचणी पॉझिटीव्ह आली. अधिवेशन नंतर ते आजारी पडले होते. गेल्या दोन दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचण्या करून घ्यावा असे आवाहन देखील भुजबळ यांनी केले आहे. भुजबळ यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान यापूर्वी देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

chhagan bhujbal
Devendra Fadnavis Threat : देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर ठेवला बॉम्ब! धमकीच्या कॉलनंतर पोलिसांची धावपळ

सध्याची आकडेवारी पाहता एका वर्षानंतर देशात कोरोनाची चौथी लाट येणार असल्याचं बोललं जात आहे. रविवारी देशभरात 1805 नवीन रुग्ण आढळले आहेत, जे गेल्या 149 दिवसांतील सर्वाधिक आहे. इतकेच नाही तर पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोनाचा हॉट स्पॉट बनलेल्या महाराष्ट्रातून पुन्हा एकदा चिंताजनक बातम्या समोर येत आहेत. गेल्या २४ तासात महाराष्ट्रात 397 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, देशात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या झपाट्याने वाढून 10,300 इतकी झाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com