Amol Mitkari: आज काल दादा होण्यासाठी स्पर्धा सुरू; अमोल मिटकरींचा रोहित पवारांना टोला

Amol Mitkari: अमोल मिटकरी वाशिम येथे राष्ट्रवादी कार्यकर्ता आढावा बैठकीसाठी आले होते त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
Amol Mitkari
Amol MitkariSaam Tv
Published On

(मनोज जयस्वाल)

Amol Mitkari on Rohit Pawar:

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांचा गट सामील झाल्यापासून शरद पवार गटातील नेते त्यांच्यावर टीका करत असतात. शरद पवार गटातील नेत्यांमधून आमदार रोहित पवार हे सडकून टीका करतात. रोहित पवार यांच्या टीकेला आमदार अमोल मिटकरींनी प्रत्युत्तर दिलंय. आजकाल दादा होण्यासाठी स्पर्धा सुरू झालीय. महाराष्ट्रात दोनच पुरोगामी लोक आहेत का, असा सवाल मिटकरी यांनी केलाय. अमोल मिटकरी वाशिम येथे राष्ट्रवादी कार्यकर्ता आढावा बैठकीसाठी आले होते त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. (Latest News)

भाजपसोबत जाण्यासाठी रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड हे दोघेही वाय बी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांची समजूत काढत होते. मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर भाजपसोबत चला असं सांगत होते. दरम्यान महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार होतं, त्यावेळी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचा आग्रह केला होता. त्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांना पत्र त्याबाबत पत्र दिलं होतं. त्या पत्रावर रोहित पवार यांचीही सही असल्याचं अमोल मिटकरी म्हणाले. मात्र आता आम्ही सत्तेत सामिल झालो तर ते आगपाखड करत असल्याची टीका मिटकरी केलीय.

दरम्यान, विकासकामांसाठी आम्ही भाजपसोबत गेल्याचं अजित पवार गटाकडून सांगण्यात येतं. आमदारांच्या मतदारसंघासाठी निधी मिळावा, शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी भाजपसोबत सरकार स्थापन केल्याचं स्पष्टीकरण अजित दादा गटाकडून केला जातो. परंतु त्यांच्या या भूमिकेवरुन शरद पवार गटाककडून टीका घेतली जाते.

भाजपसोबत जाण्यासाठी राष्ट्रवादीतील अनेक नेते तयार होते. महाविकासचं सरकार कोसळण्याच्या मार्गावर असताना राष्ट्रवादीच्या ५४ पैकी ५१ आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपसोबत सरकार स्थापनेसाठी युती करावी, असे पत्र शरद पवारांना दिलं होतं.

Amol Mitkari
Rohit Pawar Notice News | रोहित पवार यांना नोटीस, नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com