Ajit Pawar Latest Speech: कितीही संकटे आली तरी, महाराष्ट्र...';अजित पवारांनी मोदी सरकारला ललकारलं

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अजित पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला
Ajit Pawar
Ajit PawarSaam TV
Published On

सचिन बनसोडे

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अजित पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. 'कोरोना काळातील महाविकास आघाडीच्या कामाची नोंद जगाने घेतली. कितीही संकटे आली, तरी महाराष्ट्र कधी झुकणार नाही, असं म्हणत अजित पवार यांनी मोदी सरकारला ललकारलं. अजित पवार हे नाशिकमधील शेतकरी मेळाव्यात बोलत होते. (Latest Marathi News)

अजित पवार सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, अजित पवार यांनी नाशिकमधील शेतकरी मेळाव्यास हजेरी लावली. 'गारपीटीला मदत मिळाली नाही आणि गतिमान सरकार? शेतकऱ्यांना दिवसा वीज नाही आणि गतिमान सरकार? कांद्याला भाव नाही, पिकाला भाव नाही, हे तुमचे गतिमान सरकार? असा सवाल अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्य सरकारला केला.

Ajit Pawar
Shivendraraje Bhosale: वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम केले रद्द; शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतले महाराणी येसूबाई समाधीचे दर्शन

'शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार देण्याची घोषणा केली. म्हणजे दिवसाला साडेसहा रुपये? त्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या. १० महिन्यात कुठला नवीन कारखाना आणला? शिंदे फडणवीस सरकारचे दुटप्पी राजकारण आहे. स्थगिती देणारं आणि फसवणूक करणारं सरकार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात सुप्रीम कोर्टाने दुबळं सराकर असं कुणालाच म्हटलं नाही, असं म्हणत अजित पवार यांनी जोरदार घणाघात शिंदे सरकारवर केला.

'पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात शिकलेल्या लोकांनी यांनी नाकारलं. राहुल गांधींनी (Rahul Gandhi) सावरकरांवर वक्तव्य केलं, पण महाराष्ट्रातील कुठल्याही व्यक्तीने महापुरुषाबद्दल असे वक्तव्य करू नये, असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar
Vishwaraj Mahadik : कोल्हापूरमधील इर्षेंच्या राजकारणाला फाटा; विश्वराज महाडिकांच्या संवेदनशीलतेचं अनोखं रुप

'सत्ताधारी लोकांनी महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य केली, मग आम्ही काय भूमिका घ्यायची? कोरोना काळातील महाविकास आघाडीच्या कामाची जगाने नोंद घेतली.कितीही संकटे आली, तरी महाराष्ट्र कधी झुकणार नाही, असे म्हणत अजित पवार यांनी मोदी सरकारला ललकारलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com