Shivendraraje Bhosale: वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम केले रद्द; शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतले महाराणी येसूबाई समाधीचे दर्शन

वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम केले रद्द; शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतले महाराणी येसूबाई समाधीचे दर्शन
Shivendraraje Bhosale
Shivendraraje BhosaleSaam tv

सातारा : वाढदिवसा निमित्त असणारे सर्व कार्यक्रम रद्द करून आमदार छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosle) यांनी महाराणी येसूबाई यांच्या समाधीचे दर्शन घेतले. भाजप खासदार गिरीश बापट यांच्‍या निधनामुळे शिवेंद्रराजे यांनी कार्यकर्त्यांना सांगून कार्यक्रम (Satara) रद्द केले आहेत. (Breaking Marathi News)

Shivendraraje Bhosale
ED-CBI Raid At Beed Sugar Factory: शिवपार्वती साखर कारखान्यावर ईडी, सीबीआयचे छापे; कोट्यवधी रूपयांचा गैरव्‍यवहार

भाजप आमदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शिवेंद्रराजे भोसले यांचा आज वाढदिवस आहे. आज सातारा- जावळीमध्ये भरगच्च कार्यक्रमाचे नियोजन केले होते. परंतु भाजपचे जेष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याने आमदार शिवेंद्रराजे यांनी कार्यकर्त्यांना विनंती करून सर्व कार्यक्रम रद्द केले. आज त्यांनी फक्त महाराणी येसूबाई यांच्या समाधीचे दर्शन घेतलं आणि या समाधी स्थळाचा विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.

Shivendraraje Bhosale
Kalyan Crime News: अल्पवयीन मुलाला गुंगीचे औषध देत अत्याचार

काही दिवसांपूर्वीच महाराणी येसूबाई यांची ही समाधी साताऱ्यातील संगम माहुली या ठिकाणी सापडली होती. ही समाधी अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होती. पण आता याकडे गावातील ग्रामस्थांनी त्याच बरोबर इतिहास प्रेमींनी लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. आज शिवेंद्रराजे यांचा वाढदिवस असल्याने महाराणी येसूबाई यांच्या समाधीला अभिवादन करून आजच्या दिवसाची सुरुवात केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com