
मुंबई : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीबाबत आणि एकनाथ शिंदे गटाविषयी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे बंडखोर गट आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये (mva government ) सत्तासंघर्ष सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर पवार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, आमचा उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. जे आमदार गुवाहाटीला गेले आहेत ते पु्न्हा परत येतील. राज्य सरकारला कुठलाही धोका नाही. शिवसेनेचा एक गट आसाममध्ये गेला आहे, त्यांच्याकडून ज्या प्रतिक्रिया येत आहेत. यावरुन एकनाथ शिंदे गटाला सत्तापरिवर्तन हवं आहे, यासाठीच ते प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. बंडखोर आमदार मुंबईत परत आल्यावर भूमिका बदलेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे.
पत्रकार परिषदेत पवार पुढे म्हणाले, आमचा उद्धव ठाकरे यांच्यावर पूर्व विश्वास आहे. जे आमदार आसाममध्ये गेलेत ते पुन्हा परततील. सरकारला कुठलाही धोका नाही. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उद्या यशवंत सिन्हा यांचा अर्द दाखल करणार आहे. भाजपविरोधी पक्ष एकत्र येत उद्या अर्ज भरतील. निवडणूतक जिंकल्यासाठीच लढवल्या जातात. शिवसेनेचा एक ग्रुप आसाममध्ये गेला आहे. त्यांना सत्तापरिवर्तन हवं आहे, त्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. गेलेले आमदार मुंबईत परत आल्यावर भूमिका बदलेल. आमचा उद्धव ठाकरेंना पूर्ण पाठिंबा आहे. प
पवार पुढे म्हणाले, राष्ट्रपती राजवट आली तर भाजपनं एवढं केलं त्याचं फायदा काय ? राष्ट्रपती राजवट आली तर बंडाला अर्थ काय, संख्याबळ असेल तर बंडखोर गुवाहाटीत का थांबले ? बंडखोरांनी निवडलेलं राज्य गुजरात आणि आसाम, या दोन्ही राज्यात सत्ता कोणाची आहे ? अशी प्रतिक्रिया देत पवारांनी भाजपवर निशाणा साधला. ते पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे गटासोबत जर इतर राष्ट्रीय पक्ष नसतील तर भाजपशिवाय कोण ? आम्ही शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत.
बंडामागे भाजपचा हात असू शकतो. गैरप्रकार घडू नये म्हणून आमदारांना सूरक्षा दिली आहे. मॅच फिक्सिंग असेल तर आम्ही एवढी ओढाताण का करतोय. बंडखोरांवर कारवाईचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. येत्या दोन तीन दिवसात कारवाई होईल अशी अपेक्षा, आज नाहितर उद्या बंडखोरांचे राजीनामे घेतले जातील. आमदारांना परत आणण्यासाठी लवकरच पावलं उचलणार.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.