Amravati News : नवनीत राणांची खासदारकी धोक्यात? चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने अमरावतीचं राजकारण बदलण्याची शक्यता

Political News : राज्यात शिंदे-फडणवीस युतीत २०० आमदार निवडून आणायचे आहेत.
Navneet Rana
Navneet RanaSaam tv
Published On

अमर घटारे

Amravati News : भाजप-शिवसेना युतीतीत मित्रपक्ष असलेल्या प्रहारने आधीच अमरावती लोकसभा जागेसाठी आग्रह धरला आहे. त्या आता भाजपने देखील अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजप खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याने विद्यमान खासदार नवनीत राणा यांची चिंता वाढली आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस युतीत २०० आमदार निवडून आणायचे आहेत. अमरावतीतील जागेसह ४५ खासदार निवडून आणायचे असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. मोदी सरकारला नव वर्ष पूर्ण झाले आहे. या ९ वर्षातला लेखाजोखा मांडण्यासाठी अमरावतीत सभेचे आयोजन केले गेले. यावेळी सभेला संबोधित करताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०२४ साठी संकल्प केला आहे. (Maharashtra News)

Navneet Rana
Satara News : उदयनराजेंना शिवेंद्रराजेंचा विराेध? सातारा लोकसभेसाठी भाजपचा नव्या उमेदवाराचा शोध सुरु, 'ही' नावे चर्चेत (पाहा व्हिडिओ)

भाजप प्रदेशाध्यक्षांच्या या वक्तव्यामुळे भाजपसोबत युतीत असलेल्या आणि नेहमी भाजपची बाजू घेणाऱ्या खासदार नवनीत राणांची चिंता मात्र वाढली आहे. गेल्यावेळी राणा दाम्पत्यांच्या दहीहंडी कार्यक्रमाला देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी कमळाचा खासदार निवडून आणायचा असं अमरावतीत वक्तव्य केलं होतं.

Navneet Rana
Darshana Pawar Death Case : शेवटचं बोलायचं म्हणून राजगडावर नेलं, अन्... दर्शना पवारच्या हत्येचं धक्कादायक कारण आलं समोर

बच्चू कडूही आग्रही

अमरावतीत राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यातील संघर्ष लपून राहिलेला नाही. लोकसभा मतदारसंघाच्या जागेच्या दावा ठोकणार असल्याचं आधीच बच्चू कडू यांनी म्हटलं होतं. प्रहारकडून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारही तयार आहे. (Latest Marathi News)

बच्चू कडू यांचे निकटवर्तीय रवींद्र वैद्य हे खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात निवडणूक लढतील अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे आधी प्रहार आणि आता भाजप अशा दुहेरी आव्हानातून राणा दाम्पत्य कसा मार्ग काढणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com