Nahik Shitkada Waterfall : निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाताय सावधान; शीतकडा धबधब्यावर पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला

Bees attack tourists : शानिकला शीतकडा धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. यामध्ये काही पर्यटक जखमी झाले आहेत.
Bees attack tourists
Nahik Shitkada Waterfall Saam TV
Published On

धबधबा किंवा निसर्गरम्य काही ठिकाणी फिरण्यासाठी गेल्यावर तेथे अनेक प्राणी तसेच पक्षी असतात. असे प्राणी किंवा पशू -पक्षी केव्हा आपल्यावर हल्ला करतील काही सांगता येत नाही. त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे असते. अशात नाशिकमध्ये धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या काही पर्यटकांवर अशाच पद्धतीने मधमाशांचा हल्ला झाला आहे.

Bees attack tourists
Murud Janjira Tourism : चारही बाजूने विशाल समुद्र अन् मध्ये किल्ला; मुरुड जंजिराचं सौंदर्य पाहून वास्तुच्या प्रेमात पडाल

नाशिकच्या हरिहर गड परिसरातील प्रसिद्ध शीतकडा धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास पर्यटकांवर अचानक मधमाशांचा हल्ला झाला. या हल्ल्यात चार ते पाच पर्यटक किरकोळ जखमी झालेत.

ट्रेक लिडरच्या योग्य नियोजनामुळे आणि अनुभवामुळे या पर्यटकांवरील मोठा धोका टळला आहे. रविवारी नाशिकहून हिमऑरडील या ट्रेकींग संस्थेतर्फे हरीहर गड परिसरातील प्रसिद्ध शीतकडा धबधबा पाहण्यासाठी काही पर्यटक गेले होते. त्यावेळी दुपारी साधारण १२ वाजेच्या सुमारास मधमाशांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला.

या हल्लात ४-५ पर्यटक किरकोळ जखमी झाले. मधमाशांचा हल्ला झाल्यानंतर ट्रेक लिडर आणि त्यांच्या संपूर्ण टिमने योग्य वेळी खबरदारी घेत सर्वांना जमीनीवर झोपण्यास सांगितले. जमिनीवर झोपलेले असताना कोणत्याही प्रकारे हालचाल करू नका अशा सूचना दिल्या. पर्यटकांनी सुद्धा या सूचनांचे पालन केल्याने मोठी हानी टळली.

तब्बल २०-२५ मिनिटं या मधमाशा पर्यटकांच्या डोक्यावर आणि अंगाभोवती घिरट्या घालत होत्या. काही ट्रेकर्सने वेखंडाच्या पावडरचा उपयोग करून मधमाशांना दूर पळून लावल्याने धोका टळला.

हरिहर गडावर कसं पोहचाल

दरवर्षी हरिहर किल्ल्यावर फिरण्यासाठी येथील आसपासच्या निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक येथे भेट देतात. या किल्ल्याला हर्षगढ़ असंही म्हटलं जातं. हा किल्ला नाशिक शहरापासून ४० किमी अंतरावर आहे. नाशिक स्थानकातून तुम्ही बसने सुद्धा येथे पोहचू शकता. इगतपुरीपासून किल्ला ४८ किमी अंतरावर आहे. तर घोटीपासून हा किल्ला ४० किमी अंतरावर आहे.

Bees attack tourists
Nagpur Tourism : नागपूरमधील नयनरम्य ठिकाणे; आयुष्यात एकदा तरी नक्की भेट द्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com