Mallikarjun Kharge: मल्लिकार्जुन खरगेंचा सभामंडप सोसाट्याच्या वादळामुळे कोसळला, कार्यकर्ते जखमी; पाहा VIDEO
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेचा मंडप कोसळल्याची घटना समोर आली आहे. नाशिकमधील इगतपुरी- त्रंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार लकी जाधव यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी भलामोठा मंडप उभारण्यात आला होता. पण अचानक आलेल्या वादळामुळे सभा मंडप कोसळला. या घटनेमध्ये सभेसाठी आलेले कार्यकर्ते किरकोळ जखमी झालेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या सभास्थळी मल्लिकार्जुन खरगे तिथे उपस्थित नव्हते.
अचानक मंडप कोसळल्यामुळे सभास्थळी उपस्थितांची तारांबळ उडाली. सभा मंडप कोसळल्यामुळे कार्यकर्त्यांची पळापळ झाली. त्याचवेळी हेलिपॅडवरून निघालेल्या मल्लिकार्जुन खरगे यांचा ताफा पुन्हा माघारी नेण्यात आला. नाशिकमध्ये प्रचारासाठी आलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली होती. सभेसाठी मल्लिकार्जुन खरगे हेलिकॉप्टरने त्र्यंबकेश्वर येथील हेलीपॅडवर आले असता त्यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या पथकाकडून त्यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या पुण्यामध्ये दोन महत्वाच्या सभा होणार आहे. या सभेला मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार उपस्थित राहणार आहेत. पुणे कँटोन्मेटमध्ये रमेश बागवे यांच्या प्रचारासाठी ही जाहीर सभा होणार आहे. खडकवासलात सचिन दोडके आणि यांच्यासाठी सभा होणार आहे. रमेश बागवे यांचा मागील निवडणुकीत कमी फरकाने पराभव झाला होता. त्यामुळे त्यांच्यासाठी शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. संध्याकाळी सहा वाजता काकडे मैदान संविधान चौक येथे सभा होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.