Nashik News: क्रिकेट खेळताना तरुणाचा अचानक मृत्‍यू; नाशिकमधील घटना

क्रिकेट खेळताना तरुणाचा अचानक मृत्‍यू; नाशिकमधील घटना
Nashik News
Nashik NewsSaam tv

तबरेज शेख

नाशिक : नाशिकमध्ये क्रिकेट (Cricket) खेळताना एका तरुणाचा मृत्यू (Death) झाल्याची घटना कॉलेज रोड भागात समोर आली आहे. आकाश रवींद्र वाटेकर (वय 32) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Breaking Marathi News)

Nashik News
Pathan Movie: फॅन्सकडून केक कापून जल्‍लोष; काही ठिकाणी मात्र विरोध

गंगापूररोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश हा कॉलेज रोड भागात असलेल्या एनबीटी लॉ कॉलेजमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. क्रिकेट खेळत असताना आकाशला अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांनतर तो बेशुद्ध पडला. यावेळी त्याला तात्काळ त्याच्या मित्रांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले.

हृदयविकाराच्‍या झटक्‍याचे कारण

मात्र आकाशची प्राणज्योत मालवली होती. हृदय विकारच्या झटक्याने आकाशचा मृत्यू झाल्याचे कारण समोर येत आहे. या घटनेने वाटेकर कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून शहर परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com