Pathan Movie: फॅन्सकडून केक कापून जल्‍लोष; काही ठिकाणी मात्र विरोध

फॅन्सकडून केक कापून जल्‍लोष; काही ठिकाणी मात्र विरोध
Pathan Movie
Pathan MovieSaam tv

नांदेड : अभिनेता शाहरूख खानचा पठाण चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला. अनेकांनी ‘फस्‍ट डे फस्‍ट शो’ पहाण्यासाठी गर्दी केली होती. (nanded) नांदेडमध्‍ये शाहरूख खानच्‍या (Shahrukh Khan) फॅन्‍सने चित्रपट गृहाबाहेर केक कापून जल्‍लोष केला. मात्र काही शहरांमध्‍ये चित्रपटाला विरोध झाला. (Maharashtra News)

Pathan Movie
Beed News: दुर्दैवी घटना..पती- पत्नीचा हिटरचा शॉक लागून मृत्यू

नांदेडमध्ये अभिनेता शाहरुख खानच्या पठाण चित्रपट पहाण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली. शाहरुख खानच्या चाहत्यांनी नांदेडमधील भारत स्क्वेअर तसेच अन्य चित्रपट गृहात 'फस्ट डे फस्ट शो'साठी पाचशे टिकट बुकींग केली होती. तसेच चित्रपट गृहाबाहेर केक कापून जल्लोष साजरा केला. बजरंग दलाने पठाण (Pathan) चित्रपटाला विरोध केल्याने पोलिस बंदोबस्त वाढवला.

अहमदनगरात विरोध

‘पठाण’ या चित्रपटाला अहमदनगर शहरात विरोध करण्यात आला. चित्रपटगृहावर मोटार सायकल रॅली काढून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन करत विरोध केला. तसेच चित्रपटगृहा समोर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची निदर्शने केली. यामुळे तोफखाना पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तरी देखील नगर शहरात चित्रपट चालू देणार नसल्‍याची भुमिका बजरंग दलाची आहे. तसेच चित्रपट प्रदर्शित करणे बंद केले नाही; तर उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा शहराध्यक्ष कुणाल भंडारी यांनी दिला.

डोंबिवलीतही विरोध

डोंबिवलीमध्‍ये पठाण चित्रपटाला बंजरंग दलाकडून विरोध झाला. शहरातील मधुबन चित्रपटगृहात ‘पठाण’चा शो रद्द करण्याची मागणी केली. तसेच शो रद्द न केल्यास चित्रपट बंद पाडून तीव्र आंदोलन छेडणार असल्‍याचा इशारा दिला. या प्रकारामुळे मधुबन चित्रपट गृहासह इतर चित्रपटगृहात देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com