Nashik Municipal Corporation Job Vacancy 2023: नाशिककरांसाठी खुशखबर, महापालिकेत ७०६ पदांसाठी निघणार नोकरभरतीची जाहिरात

Government Jobs 2023: नाशिककरांसाठी खुशखबर, महापालिकेत ७०६ पदांसाठी निघणार नोकरभरतीची जाहिरात
nashik municipal corporation
nashik municipal corporation saam tv
Published On

Nashik Municipal Corporation Job Vacancy 2023: नाशिकमध्ये डिसेंबर महिन्यापर्यंत आस्थापना खर्च ३५ टक्क्यापेक्षा कमी असल्याशिवाय नोकरभरती करता येणार नाही, या अटीला सवलत असल्यामुळे महापालिकेने ७०६ पदांच्या नोकरभरतीसाठी हालचाली गतीमान केल्या आहेत.

जूलै महिन्याच्या अखेरपर्यंत टिसीएस या कंपनीमार्फत नोकरभरतीसाठी आवश्यक सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. तसे झाले तर जुलैअखेरीस नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्ध करता येईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आलीय.

nashik municipal corporation
Satara Bribe Case: दोन दिवसांपूर्वी फौजदार झाला, अन् लाच घेताना पकडला

कोरोनाकाळात महापालिकेतील नोकरभरतीचे महत्व लक्षात आले होते. अपुऱ्या मनुष्यबळामुळे महापालिकेची चांगलीच ओढाताण झाली होती. कंत्राटी तत्त्वावर दोन हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करून महामारीचा सामना करण्यात आला. (Latest Marathi News)

दरम्यान, महापालिकेत आस्थापना परिशिष्टावरील विविध संवर्गातील ७०८२ पदे मंजूर असून त्यातील जवळपास २८०० पदे सध्या रिक्त आहेत. मात्र ३५ टक्क्यांवर आस्थापना खर्च जात असेल तर रिक्त पदांची भरती करू नये, अशी अट असल्यामुळे पालिकेला नोकरभरती करण्यावर मर्यादा होत्या.

nashik municipal corporation
Pune Water Crises : पुणेकरांची चिंता वाढली; पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी गाठला तळ

मात्र आता शासनाने अग्निशमन विभागातील ३४८ तर वैद्यकीय विभागातील ३५८ अशा एकूण ७०६ पदांच्या भरतीला मान्यता दिल्याने या पदांवर नोकरभरती करण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com