Chagan Bhujabal News : ओबीसी घटकांनी एकत्र येऊन काम करायला हवं; मंत्री छगन भुजबळ

Nashik News : मराठा समाजाला आरक्षण देण्यास आपला कुठलाही विरोध नव्हता. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे; अशी आपली मागणी होती.
Chagan Bhujabal
Chagan BhujabalSaam tv
Published On

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : ओबीसी समाजातील अनेक जातीत पोटजाती आहे. जर आपले न्याय हक्क मिळवायचे असतील, तर ओबीसी (OBC) घटकांनी एकत्र येऊन काम करायला हवं. तसेच ओबीसीमध्ये असलेल्या भोई समाज बांधवांनी सर्व पोटजातीनी एकत्र येऊन भोई समाज म्हणून एका छताखाली यायला हवं; असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी केले. (Latest Marathi News)

Chagan Bhujabal
Jalgaon News : कर्जफेडीची विवंचना; रेल्वेसमोर उडी मारत शेतकऱ्याने संपविले जीवन

नाशिकच्या (Nashik) येवला येथील महात्मा फुले नाट्यगृह येथे आज भोई समाज आरक्षण एल्गार बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Aarkshan) देण्यास आपला कुठलाही विरोध नव्हता. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे; अशी आपली मागणी होती. आता मराठा समाजाला स्वतंत्र आणि टिकणार आरक्षण देण्यात आलं आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chagan Bhujabal
Jalgaon News : जळगाव जिल्हा रुग्णालयात बाळांसाठी 'मदर मिल्क बँक'

जातनिहाय जनगणना व्हावी 

तसेच ओबीसीतील सर्व घटकांनी एकत्र आले, तरच प्रश्न सुटतील. देशात जातनिहाय जनगणना करणे ही आपली मागणी आहे. त्यामुळे सर्व ओबीसी घटकांनी एकत्र येऊन लढल पाहिजे असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com