Ganesh Festival: एकाच ठिकाणी अष्टविनायकाचं दर्शन; नाशिककरांचे आराध्य दैवत नवशा गणपती

Nashik News : एकाच ठिकाणी अष्टविनायकाचं दर्शन; नाशिककरांचे आराध्य दैवत नवशा गणपती
Nashik Navshya Ganapati
Nashik Navshya GanapatiSaam tv
Published On

नाशिक : सर्वांच्या लाडक्या श्रीगणेशाची जशी अनेक रूपं आहेत. तशीचं गणपतीची नावही अनेक आहेत. नाशिककरांचे (Nashik) आराध्य दैवत आणि श्रद्धास्थान असलेला असाच एक वेगळा गणपती म्हणजे नवश्या गणपती. विशेष म्हणजे (Ganapati Festival) या मंदिरात एकाच ठिकाणी अष्टविनायकाचंही दर्शन होतं. यामुळे वर्षभर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची इथं रिघ लागलेली असते. (Maharashtra News)

Nashik Navshya Ganapati
Dance Viral Video: 'नको मला बंगला, नको गाडी पाहिजे...'; मराठमोळ्या महिलेचा दुबईत हटके डान्स, व्हिडिओ पाहून तुम्ही म्हणाल

दक्षिणवाहीनी गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या तीरावरील नवशा गणपतीचे मंदीर (Ganapati Mandir) आहे. नवसाला पावणारा म्हणून नवशा गणपती असं नाव या गणपतीला पडले आहे. पुत्रप्राप्ती झाल्यानंतर नवसपूर्ती करण्यासाठी आनंदीबाई आणि राघोबादादा पेशव्यांनी १७७४ साली या गणपतीची स्थापना केल्याचा उल्लेख आहे. नवशा गणपतीची मुर्ती अत्यंत तेजोमय आहे. तर मुर्तीचे डोळेही अगदी सजीव वाटतात. 

Nashik Navshya Ganapati
Gondia Crime News: नकली सोने विकणाऱ्या तरुणाची हत्या; दोघांवर प्राणघातक हल्ला, पाच जणांना अटक

नवशा गणपती मंदिराला ३०० वर्षांचा इतिहास आहे. गणपतीचं मंदिर आणि इथल्या परिसरात अशा शेकडो- हजारो घंटा बांधलेल्या पहावयास मिळतात. मागितलेला नवस पूर्ण झाल्यानंतर भाविक या घंटा बाप्पाला अर्पण करतात. पेशवेकालीन या गणपती बाप्पावर नाशिककरांची अपार श्रद्धा आहे. तसंच इथला गोदाकाठचा शांत आणि निसर्गरम्य परिसरात भाविकांना अपार मनःशांतीचा अनुभव येतो. त्यामुळे फक्त गणेशोत्सवातच नाही, तर वर्षभर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची इथं रिघ लागलेली असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com