Nashik Leopard : ओझरमध्ये तारेच्या कुंपणात अडकलेला बिबट्या ; वनविभागाने सुखरुप काढले बाहेर

शिकच्या (Nashik) म्हसरूळ शिवारात बिबट्याने (Leopard) घरात घुसून एकावर हल्ला केल्याची घटना ताजी असताना ओझरमध्येही आता एक बिबट्या आढळून आला आहे.
nashik Leopard news
nashik Leopard news saam tv

नाशिक : नाशिकच्या (Nashik) म्हसरूळ शिवारात बिबट्याने (Leopard) घरात घुसून एकावर हल्ला केल्याची घटना ताजी असताना ओझरमध्येही आता एक बिबट्या आढळून आला आहे. ओझरमध्ये बिबट्या आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ओझरमधील 'एचएएल'च्या कंपाऊंड वॉलच्या तारेत बिबट्या अडकला होता. या बिबट्याला रेस्क्यू करण्यात वनविभागाला यश आलं आहे. ( Nashik News In Marathi)

nashik Leopard news
Mumbai| ४ महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न; विवाहित तरुणीने उचलले धक्कादायक पाऊल

नाशिकच्या ओझरमधील 'एचएएल'च्या कंपाऊंड वॉलच्या तारेत बिबट्या अडकला होता. 'एचएएल'च्या कंपाऊंड वॉलच्या तारेत अडकलेल्या बिबट्याला रेस्क्यू करण्यात यश आलं आहे. ओझरमधील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या कंपाऊंड वॉलच्या तारेच्या कुंपणामध्ये अडकलेल्या बिबट्याला सुरक्षितपणे वाचवण्यात वनविभागाला यश आलं आहे.

nashik Leopard news
Nashik News : प्रेयसीच्या मौजमजेसाठी तो करायचा दुचाकी चोरी; असा अडकला जाळ्यात

नेमकं काय घडलं होतं ?

मंगळवारी सकाळी कंपाऊंड वॉलच्या तारेत हा बिबट्या अडकल्याची माहिती वनविभागाला मिळाली. भक्ष्याच्या शोधात फिरत असताना हा बिबट्या कंपाऊंड वॉलच्या तारेत अडकून पडल्याने जखमी झाला होता. बिबट्याला तारेच्या कुंपणातून स्वतःची सुटका करता न आल्यानं तो तसाच जखमी अवस्थेत पडलेला होता. अखेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला बेशुद्ध करून त्याची कुंपणातून सुटका केली आणि त्याला पिंजऱ्यात जेरबंद केलं. आवश्यक उपचार आणि तपासणी करून या बिबट्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडलं जाणार आहे.

दरम्यान, याआधीही नाशिकच्या म्हसरूळ आणि सातपूर एमआयडीसी परिसरात बिबटयाचे दर्शन झाले होते. बिबट्याने म्हसरुळमधील एकावर हल्ला केला होता. तसेच एक बिबट्या हा सातपूर एमआयडीसी परिसरातील सीसीसटीव्हीमध्ये कॅमेऱ्यात कैद झाला होता. शहरी वस्तीत बिबट्याचे दर्शन होऊ लागल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. तर बिबट्यांचे आगमन शहरी वस्तीत वाढल्याने वन विभागाची देखील डोकेदुखी वाढली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com