Nashik News : नाशिकमधील गावात भुताचा डाव, कॅमेऱ्यामध्ये 'स्त्री' कैद; सत्यघटना की अफवा?

Nashik Village News : निफाड तालुक्यातील शिरवाडे-धामोरी रस्त्यावर नदीजवळ एका वाहन चालकाला भुताने बेदम मारहाण केली अशी अफवा पसरली आहे. या घटनेचे फेक फोटो, व्हिडीओ पसरवले जात आहेत.
Ghost video in nashik
Ghost video in nashikSaam Tv
Published On

तरबेझ शेख साम प्रतिनिधी

Nashik News : नाशिकच्या निफाड तालुक्यात एक विचित्र प्रकार घडला आहे. निफाड तालुक्यातील शिरवाडे ते धामोरी रस्त्यावर नदीजवळ एका वाहन चालकाला भूत दिसले, त्या भुताने चालकाला बेदम मारहाण केली अशी अफवा धामोरी परिसरात पसरली आहे. भूताची ही गोष्ट खरी वाटावी यासाठी काही फोटो आणि व्हिडीओ पसरवण्यात आले आहेत. दरम्यान या घटनेची दखल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतली आहे.

रस्त्यावर वाहन चालकाला भूत दिसले. भुताने चालकाला चोप दिला हे खरे वाटावे यासाठी परिसरात फोटो, व्हिडीओ प्रसारित केले गेले आहेत. फोटोमध्ये वाहन चालकाच्या पाठीवर गंभीर जखमा झाल्याचे दिसते. तर व्हिडीओमध्ये रडण्याचे आवाज ऐकायला येत आहेत. हे फोटो, व्हिडीओ पसरल्याने प्रवाशांना त्या रस्त्यावरुन जाण्यास भीती वाटायला लागली आहे.

भुताच्या गोष्टीची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला मिळाली. जगामध्ये भूत अस्तित्वात नसते. तरीही त्याची भीती दाखवली जाते. कारण भूत हे मनात असते. लहानपणापासून अशा गोष्टींचा आपल्या मनावर पगडा बसलेला असतो. तेव्हा नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केले.

Ghost video in nashik
Chhattisgarh Accident : चिमणीनं घात केला, कारखान्यात भीषण अपघात; ढिगाऱ्याखाली २५ हून अधिक मजूर दबले, ८ मृत्यू

पसरवण्यात आलेले फोटो बारकाईने पाहिल्यावर ते बनावट असल्याचे लक्षात येते. हे फोटो, व्हिडीओ एडिट केले असल्याचे स्पष्ट होते. तसेच अनेक ठिकाणी अनेक दिवसांपासून हे फोटो, व्हिडीओ समाज माध्यमांद्वारे परवले जात आहेत असा दावा अंनिसने केला आहे. महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते अमावस्येच्या रात्री सदर ठिकाणी थांबून लोकांच्या मनातील भुताची भीती घालवण्याचा प्रयत्न करणार आहेत.

Ghost video in nashik
Palghar Politics : शिवसेनेचा राज ठाकरेंना धक्का; जिल्हाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेच्या गटात प्रवेश

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते लोकांच्या मनातील भुताबद्दलचे गैरसमज घालवण्यासाठी आणि भीती नाहीशी करण्यासाठी धामोरी गावात अंधश्रद्धा निर्मूलनाचा व प्रबोधनाचा जाहीर कार्यक्रम घेणार आहेत. तसेच शाळेमधूनही विद्यार्थ्यांना वैज्ञानिक जाणिवा निर्माण करणार आहेत. रस्त्यावर भूत दिसले ही अफवा आहे आणि अशा अफवांवर विश्वास ठेवू नये यासाठी अंनिस प्रयत्न करणार आहेत.

Ghost video in nashik
Kalyan Accident : लग्नानंतर १५ वर्षांनी मूल झालं, रस्ता ओलांडताना मायलेकाचा मृत्यू; हृदय पिळवटून टाकणारी घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com