Dengue Disease: नाशिकमध्ये डेंग्यूचा ताप वाढताच; दोन आठवड्यात ७० अहवाल पॉझिटिव्ह

Nashik News : नाशिकमध्ये डेंग्यूचा ताप वाढताच; दोन आठवड्यात ७० अहवाल पॉझिटिव्ह
Dengue Disease
Dengue DiseaseSaam tv
Published On

नाशिक : विश्रांतीनंतर पावसाचं पुनरागमन झाले. यामुळे वातावरणात बदल झाल्याने व्हायरल इन्फेकशन (Nashik) सर्वत्र पसरले आहे. यात डेंग्यूची साथ देखील वाढू लागली. नाशिकमध्ये तर डेंग्यूचा (Dengue) प्रकोप पुन्हा एकदा वाढला असून सप्टेंबर महिन्याच्या दोन आठवड्यात ७० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  (Breaking Marathi News)

Dengue Disease
Ganesh Festival: एकाच ठिकाणी अष्टविनायकाचं दर्शन; नाशिककरांचे आराध्य दैवत नवशा गणपती

नाशिक शहरामध्ये डेंग्यूची साथ पसरत असताना आता नाशिक शहर डेंग्यूचा हॉटस्पॉट बनलेला आहे. असे असताना महापालिकेच्या मलेरिया विभागाकडून केवळ कागदोपत्री कारवाया सुरू असल्याच पाहायला मिळत आहे. डेंग्यूच्या अळ्या आढळल्या प्रकरणी मलेरिया विभागाकडून आत्तापर्यंत ९१९ नागरिक आणि आस्थापनांना नोटीसा बजावल्याचे सांगण्यात आल्या. मात्र एकट्या सप्टेंबर महिन्यातच डेंग्यूच्या रुग्णांचा आकडा शंभरी पार करण्याचे चिन्ह आहे. 

Dengue Disease
Gondia News: हनुमान मंदिरात शिरत दागिन्यांची चोरी; पोलिसांनी केली आरोपीला अटक

साथ पसरत असताना नाशिक शहरात मागील दोन आठवड्यात डेंग्यूचे ४२९ संशयित रुग्ण आढळले. तर त्यातील ७० जणांना डेंग्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. तसंच सरकारी रुग्णालयांपेक्षा खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने डेंग्यूमुळे शहराची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com