Nashik News: दादा भुसेंना पालकमंत्री पदावरून हटाव; शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको

Nashik News : दादा भुसेंना पालकमंत्री पदावरून हटाव; शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको
Nashik News
Nashik NewsSaam tv

तबरेज शेख 
नाशिक
: नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पांगरी गावात सिन्नर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा. त्याचप्रमाणे (Nashik) मराठा समाजाला सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र देण्यात यावे; यासाठी गेल्या २३ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. परंतु या उपोषणस्थळी पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी भेट न दिल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले असून आज या शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. (Tajya Batmya)

Nashik News
Satpuda Sugar Factory: शेतकऱ्यांच्या उसाचे पेमेंट नऊ महिन्यापासून थकीत; शहाद्याच्या साखर कारखान्याविरोधात करणार आंदोलन

सिन्नर तालुक्यात दुष्काळ मोठ्या प्रमाणात असून जनावरांच्या चारा आणि पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात पालकमंत्री दादा भुसे यांनी ठोस भूमिका न घेतल्याने त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच ८ तारखेला सिन्नर तालुक्यातील पांगरी गावात मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा आयोजित करण्यात आली असून मनोज जरांगे पाटील हे आता फक्त मराठा समाजाचे नेतृत्वच नव्हे तर (Farmer) शेतकऱ्यांचे कैवारी देखील ठरलेले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करावा यासाठी मनोज जरांगे पाटील यांना पांगरीमध्ये उपोषणाला बसविणार असल्याची घोषणा आंदोलकर्त्यांनी केली. 

Nashik News
Sadabhau Khot News: बारामतीकर राज्यात आग लावायचे काम करतात; सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका

नाशिक- शिर्डी महामार्ग रोखला 
मागील २३ दिवसांपासून सुरु असलेल्या उपोषणस्थळाला पालकमंत्री दादा भुसे यांनी भेट न दिल्याने पांगरीचे ग्रामस्थ आक्रमक झाले. आज त्यांनी नाशिक- शिर्डी महामार्गावर रास्ता रोको करत पालकमंत्री हटावचा घोषणा दिल्या. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह जिल्हाधिकारी सपशेल अपयशी ठरले असून त्यांनी आमच्या मागण्यांचा विचार करावा अशी मागणी यावेळी आंदोलन करताना केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com