तबरेज शेख
नाशिक : रुग्णालयात दाखल रुग्णांना भेटण्यासाठी येत असलेले नातेवाईक तंबाखूजन्य पदार्थ नेवून तेथेच (Nashik) धूम्रपान करत असतात. यामुळे रुग्णांना त्रास होत असतो. या मुद्द्याशी रुग्णालयातील (Hospital) स्वछतेच्या दृष्टीकोनातुन आता जिल्हा रुग्णालयात तंबाखूजन्य पदार्थ नेण्यास बंदी करण्यात आल्याचा निर्णय नाशिक जिल्हा रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. (Breaking Marathi News)
गेल्या अनेक दिवसांपासून अनेक जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालया सोबतच नाशिक जिल्हा रुग्णालयात देखील अस्वछतेचा मुद्दा पुढे आला होता. जिल्हा रुग्णालयात अनेक ठिकाणी भिंतीवर व खिडक्यांमधून लोक गुटखा, तंबाखू आणि पान खाऊन थुंकत असतात. यामुळे रुग्णालयाच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. ही बाब लक्षात घेता जिल्हा रुग्णालयात स्वच्छता राहावी. या दृष्टिवनातून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयांमध्ये गुटखा, तंबाखू, पान, बिडी, सिगरेट अश्या आम्ली पदार्थ घेऊन जाण्यास बंदी करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
गेटवरच तपासणी
जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक पेशंट आणि त्यांचे नातेवाईक यासोबतच रुग्णालयात कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची देखील रुग्णालयाच्या प्रवेश द्वारावर कसून तपासणी करूनच जिल्हा रुग्णालयात आत प्रवेश दिला जात आहे. म्हणून जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाची झडती घेऊन त्यांच्याकडे असलेले पान, सिगरेट आणि गुटख्याच्या पुड्या जमा करण्यात येत आहे. जेणेकरून रुग्णालयात स्वच्छता राहील.आता या निर्णयाची अमलबजावणी कशा पद्धतीने होते हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.