Nashik News : विना व्याजी कर्जाचे आमिष देत ४०० जणांची फसवणूक; महिलेसह ६ अटकेत

Nashik News : एस.के. फायनान्स कंपनीच्या माध्यमातून नागरीकांना विना व्याज कर्ज देत असल्याने कागदपत्र दिले. प्रत्येक अर्जदाराकडून १२ हजार अगाऊ रक्कम घेतली.
Nashik News
Nashik News Saam tv
Published On

तबरेज शेख  

नाशिक : दुकानदार, लहान मोठे व्यावसायीकांना २ लाखांपर्यंत विना व्याजी कर्ज देण्याचे अमिष दिले. याकरिता (Nashik) त्यांच्याकडून प्रोसेसिंग व कागदपत्रांकरीता १२ हजार रुपये घेत फसवणूक (Fraud) करण्याच्या उद्देशाने फायनान्स कंपनीच्या नावे नागरीकांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य संशयित महिलेसह ६ एजंटच्या विरोधात इंदिरा नगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. (Maharashtra News)

Nashik News
Petrol Pump : पंपावर लागले पेट्रोल संपल्याच्या पाट्या; वाहनधारकांच्या लांबचलांब रांगा

नरेश शेर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार इंदिरानगर पोलिसात (Nashik Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १३ डिसेंबर ते १ जानेवारी २०२४ या कालावधीत संशयित कृष्णा रेड्डी, माधवन कृष्णन, लतिका खालकर, नवनाथ खालकर, सुगत औटे, यांच्यासह कंपनीचे २० एजंट यांनी एस.के. फायनान्स कंपनीच्या माध्यमातून नागरीकांना विना व्याज कर्ज देत असल्याने कागदपत्र दिले. प्रत्येक अर्जदाराकडून १२ हजार अगाऊ रक्कम घेतली. मात्र कर्ज कुणास दिले नाही. हा फसवणुकीचा प्रकार असल्याने भरलेली रक्कम मागीतली असता टाळाटाळ केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nashik News
Rabi Crops : हरभरा पीकावर रोगराई; ढगाळ वातावरण, धुके आणि गारठ्याचा परिणाम

नाशिकच्या इंदिरानगर पोलिसांनी वेळीच गुन्हा दाखल केल्याने अनेक नागरीकांनी फसवणूक होण्यापासून टळली. आजपर्यंत ४०० नागरीकांकडून कमी अधिक प्रमाणात पैसे घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. जवळपास ५० लांखांपेक्षा जास्त रक्कम आतापर्यत जमा करण्यात आली आहे. अटक केलेल्या संशयितांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस याबाबत चौकशी करत आहे. तसेच ज्या लोकांची फसवणूक झाली आहे त्यांनी नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क करावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com