Nashik News : त्र्यंबकेश्वरच्या प्रसिद्ध बिल्व तीर्थावरील कुंडात बुडून २ मुलींचा मृत्यू; मुबलक पाणी असतानाही पाणीटंचाईच्या ठरल्या बळी

Nashik News Update :त्र्यंबकेश्वरच्या प्रसिद्ध बिल्व तीर्थावरील कुंडात बुडून दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. योग्य पाणीपुरवठा होत नसल्यामुळे या मुली कमडे धुण्यासाठी कुंडावर गेल्या होत्या, त्यावेळी ही दुर्घटना घडली होती.
Nashik News
Nashik NewsSaam Digital

त्र्यंबकेश्वरच्या प्रसिद्ध बिल्व तीर्थावरील कुंडात बुडून दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्र्यंबकेश्वरच्या चौकी माथा परिसरात पाण्याचा तुटवडा असल्याने कपडे धुण्यासाठी दोन्ही मुली बिल्वतीर्थावर गेल्या होत्या. कपडे धुत असताना एका मुलीचा पाय घसरून ती पाण्यात पडत होती, त्यावेळी तिला वाचवताना दुसऱ्या मुलीचाही तोल गेला आणि त्या पाण्यात पडल्या. आजूबाजूला कोणी नसल्यामुळे दोन्ही मुलींचा बुडून मृत्यू झाला आहे. मुबलक पाणी असूनही वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्यानेही दुर्घटना घडली असून नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com