Chhagan Bhujbal Threatening Phone: 'मराठा आरक्षणाला विरोध केला तर...'; मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी

Chhagan Bhujbal Threatening Phone: मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
Chhagan Bhujbal News
Chhagan Bhujbal Newssaam tv

Nashik Crime News:

नाशिकमधून मोठं वृत्त हाती आलं आहे. मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दुपारच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने धमकीचा फोन केला आहे. मराठा आरक्षणाला विरोध केला तर परिणाम भोगावे लागतील, अशा आशयाची धमकी मंत्री भुजबळ यांना देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

राज्यात गेल्या महिन्याभरापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही दिवसांत मराठा आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी समता परिषदेत जरांगे यांच्यावर टीका केली होती. जरांगे यांच्या सभेवरून मंत्री छगन भुजबळ अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

Chhagan Bhujbal News
Ramdas Athawale Poem: 'ज्या गावाला लागली बाबासाहेबांची पावले, त्या शहराचे नाव आहे येवले', रामदास आठवले...

दरम्यान, छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. 'तुम्हाला जिवंत ठेवणार नाही. मराठा आरक्षणाला विरोध कराल तर परिणाम भोगावे लागतील, अशा धमक्या छगन भुजबळ यांना फोनवरून मिळाल्या आहेत.

मंत्री भुजबळ यांना दुपारच्या सुमारास या अज्ञात व्यक्तीकडून धमक्या मिळाल्या आहेत. धमक्या मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदविण्यासाठी धाव घेतली.

दरम्यान, छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

'तुम्हाला जिवंत ठेवणार नाही. मराठा आरक्षणाला विरोध कराल तर परिणाम भोगावे लागतील, अशा धमक्या छगन भुजबळ यांना फोनवरून मिळाल्या आहेत. मंत्री भुजबळ यांना दुपारच्या सुमारास या अज्ञात व्यक्तीकडून धमक्या मिळाल्या आहेत. धमक्या मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदविण्यासाठी धाव घेतली.

Chhagan Bhujbal News
Rahul Narvekar: 'आदेशाचं पालन केलं जाईल, परंतु', सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर नार्वेकरांनी दिली पहिली प्रतिक्रिया

छगन भुजबळ यांना याआधी देखील जीवे मारण्याची धमकी

मंत्री छगन भुजबळ यांना याआधी फोनवरून धमक्या मिळाल्या आहेत. भुजबळ यांना ११ जून रोजी फोनवरून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. छगन भुजबळ मंत्री झाल्यानंतर त्यांना धमकी मिळाली होती.

भुजबळ यांच्या कार्यालयात फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर धमकी देणाऱ्या प्रशांत पाटील नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com