Nashik NMC News: नाशिककरांनो घरपट्टी लवकर भरा...अन्यथा दारासमोर वाजतील ढोल

Nashik Property Tax News: नागरिकांनी पालिकेचे जवळपास ३५० कोटी रुपये थकवले आहेत. त्यामुळे ही वसूली करण्यासाठी पालिकेने आता कंबर कसली आहे.
Nashik Property Tax News
Nashik Property Tax NewsSaam TV
Published On

Nashik Property Tax News: नाशिककरांनो तुमच्यासाठी महत्वाची बातमी. तुमच्या मालकीच्या घराचा कर म्हणजे घरपट्टी (Property Tax) तुम्ही अजूनही भरली नसेल तर ती लगेच भरा. याचं कारण म्हणजे नाशिक महानगरपालिकेने (NMC) आता घरपट्टी वसूलीसाठी नवीन शक्कल लढवली आहे. ज्या नागरिकांनी घरपट्टी भरलेली नाही त्या नागरिकांच्या दारासमोर नाशिक महापालिका ढोल वाजवून गांधीगिरी स्टाईलने घरपट्टी वसूल करणार असल्याची माहीती मिळत आहे. (Nashik Latest News)

Nashik Property Tax News
Shivsena: आमच्या पक्षासोबत भेदभाव तर शिंदे गटाला प्राधान्य; उद्धव ठाकरेंचं निवडणूक आयोगाला 4 पानांचं खरमरीत पत्र

मिळालेल्या माहीतीनुसार, नाशिक (Nashik) महापालिकेच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे. अनेक नागरिकांनी घराचा, मालमत्तेचा कर म्हणजे घरपट्टी थकवली आहे. त्यामुळे पालिकेची तिजोरी सध्या थंड आहे. त्यामुळे नाशिक महानगर पालिकेच्या कर विभागाच्या वतीने विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. यानुसार शहरातील जवळपास 25 हजाराहून अधिक घरमालक थकबाकीच्या यादीत सहभागी आहेत. त्यापैकी बड्या १२५८ थकबाकीदारांवर (Outstanding) पालिकेने कारवाईचा इशारा दिला आहे. नागरिकांनी पालिकेचे जवळपास ३५० कोटी रुपये थकवले आहेत. त्यामुळे ही वसूली करण्यासाठी पालिकेने आता कंबर कसली आहे. (Maharashtra News)

Nashik Property Tax News
Hijab Case Hearing: हिजाब वादावर दोन्ही न्यायाधीशांमध्ये एकमत नाहीच; प्रकरण घटनापीठाकडे वर्ग

वारंवार आवाहन करून देखील घरपट्टीची थकबाकी कमी होत नसल्याने पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यानुसार सोमवारी १७ ऑक्टोबरपासून घरपट्टी थकबाकीदारांच्या घरासमोर पालिका ढोल वाजवून त्यांना कर भरण्याच्या सुचना देणार आहे. १ लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या बड्या थकबाकीदारांच्या घरासमोर हे ढोल वादन करण्यात येणार आहे. घरपट्टी वसुलीसाठी महापालिकेची ही विशेष मोहीम सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे नाशिककरांनो सुज्ञ नागरिकांप्रमाणे तुम्हीही लकवकरात लवकर घरपट्टी भरुन टाका, अन्यथा तुमच्या दारासमोर पालिकेचे ढोल वाजणार हे मात्र नक्की.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com