Nashik News: 'खर्च महापालिकेचा आणि चर्चा भाजपची'; कार्यक्रम शासनाचा की पक्षाचा?

Nashik News: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नाशिकच्या सातपूर परिसरातील नाशिक महापालिकेच्या श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाचे लोकार्पण करण्यात आले.
nashik municipal corporation
nashik municipal corporation saam tv

तबरेज शेख

Nashik News: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नाशिकच्या सातपूर परिसरातील नाशिक महापालिकेच्या श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाचे लोकार्पण करण्यात आले. सदर शाळा ही महानगरपालिकेची असूनही, या संपूर्ण लोकार्पण कार्यक्रमात भाजपचे वर्चस्व दिसून आले. त्यामुळे महानगरपालिकेचा खर्च आणि भाजपची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. (Latest Marathi News)

नेमकं काय घडलं?

दोन वर्षांपूर्वी या शाळेच्या काही भागाचे काम करून लोकार्पण करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा या शाळेच्या वरच्या मजल्यासह इतर सुविधा देण्यात आल्या आहे. या सोयीसुविधांसाठी महानगरपालिकेचा जवळपास 25 कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती मिळाली आहे. या प्रभागाचे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांच्या प्रयत्नातून या शाळेत सुविधा मिळाली आहे.

nashik municipal corporation
Raj Thackeray On Rs 2000 note withdrawn: नोटबंदीच्या निर्णयावरून राज ठाकरे नाशकात कडाडले; म्हणाले, कोणतंही पूर्वनियोजन ...'

मात्र महानगरपालिकेच्या शाळेच्या लोकार्पणासाठी महापालिका प्रशासन दूर राहिल्याचे दिसून आले. कार्यक्रमाच्या फलकावर महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने कुणाचेही नाव दिसून आले नाही.

nashik municipal corporation
Sanjay Raut On Pm Modi: 'बाळासाहेब ठाकरे 1 लाख मोदींना भारी', बीडमध्ये राऊतांची तोफ धडाडली

या संपूर्ण कार्यक्रमावर भाजपचे वर्चस्व होते. त्यामुळेच 'खर्च महापालिकेचा आणि चर्चा भाजपची' असा प्रकार या कार्यक्रमात दिसून आला. यावर स्पष्टीकरण देताना माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी, 'मी महानगरपालिकेचाच आहे' असे उत्तर दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.