Malegaon Police : नशेसाठी केला जातोय औषधांचा वापर; २५० गुंगीकारक औषध बाटल्या मालेगावात जप्त

Malegaon News : किल्ला पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन इसम मोठ्या प्रमाणात प्रवासी रिक्षामध्ये प्रतिबंधित केलेल्या गुंगीकारक औषधांचे बाटल्या चोरट्या रितीने अवैधरित्या विक्री करण्याचे उद्देशाने आणले होते
Malegaon News
Malegaon NewsSaam tv
Published On

अजय सोनवणे 

मालेगाव (नाशिक) : नशेखोरांचा बाजार नेहमीच भरलेला दिसतो. नशा करण्यासाठी काही गुंगीकारक औषधींचा देखील वापर केला जात असल्याचे धक्कादायक प्रकार पाहण्यास मिळत असून हे गुंगीकारक औषधी पुरवठा करणारी टोळीच सक्रिय झालेली आहे. अशाच प्रकारे मालेगावमध्ये नशेसाठी वापर केल्या जाणाऱ्या २५० गुंगीकारक औषध जप्त करण्याची कारवाई किल्ला पोलिसांनी केली आहे.

नशा करणारे वेगवेगळ्या प्रकारे नशा करत त्यामध्ये गुंग असतात. यासाठी काही विशिष्ट गुंगुकारक औषधींचा वापर देखील करत असतात. अशाच प्रकारे नाशिकच्या मालेगाव किल्ला पोलीस ठाणेच्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना गुंगीकारक औषधी घेऊन दोनजण येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या गोपनीय बातमीच्या आधारे सापळा रचत किल्ला पोलिसांनी मनमाड रोडवर मालेगांव येथे कारवाई केली आहे. 

Malegaon News
Nashik Crime News: किरकोळ वादातून रिक्षाचालकानेच केला रिक्षाचालकाचा खून; तिघेजण पोलिसांच्या ताब्यात, नाशिकमधील घटना

२१५ औषधींचा बाटल्या केल्या जप्त 

किल्ला पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन इसम मोठ्या प्रमाणात प्रवासी रिक्षामध्ये प्रतिबंधित केलेल्या गुंगीकारक औषधांचे बाटल्या चोरट्या रितीने अवैधरित्या विक्री करण्याचे उद्देशाने आणले होते. रिक्षात विक्रीसाठी सदरची औषधीच बाळगुन असताना त्यांच्यावर छापा टाकून त्यांच्या ताब्यातून गुंगी आणणाऱ्या औषधांचे एकुण २१५ सिलबंद बाटल्या त्यांची एकुण किंमत ४० हजार ८५० रुपयांच्या व एक प्रवासी वाहतुक रिक्षा असा एकुण २ लाख ८५० असा मुद्देमाल जप्त केला आहे. 

Malegaon News
Shahada Police : गुटख्याची गुजरातमधून वाहतूक; शहादा पोलिसांकडून २४ लाखाचा गुटखा जप्त

दोघांना घेतले ताब्यात 

या कारवाईत पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत करत रिक्षातून औषधी आणणाऱ्या गांधी नगरातील रियाज अहमद मोहम्मद फारुख (वय २६) व मालेगावच्या मदनीनगरातील नवीद शफी देशमुख (वय २४) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच गुंगीकारक औषधी मिळुन आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोउनि बी. एस. चव्हाण करीत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com