Malegaon News: ६ वर्षीय चिमुकल्‍याला सोबत घेत पित्‍याची विहिरीत उडी; गाडी उभी असल्‍याने आला संशय

Nashik Malegaon News: ६ वर्षीय चिमुकल्‍याला सोबत घेत पित्‍याची विहिरीत उडी; गाडी उभी असल्‍याने आला संशय
Malegaon News
Malegaon NewsSaam tv

अजय सोनवणे

नाशिक: नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील (Malegaon) आघार- ढवळेश्वर येथील यशवंत लक्ष्मण हिरे या पित्याने आपल्या ६ वर्षीय मुलाला सोबत घेत विहिरीत उडी मारून आत्‍महत्‍या केली. ही (Nashik News) घटना आज उघडकीस आली आहे. (Live Marathi News)

Malegaon News
Nandurbar Accident News : जळगावच्या दिशेने जाणा-या Car चा बर्डीपाडा टोलनाक्यावर अपघात; महिला ठार, आठ जखमी

मालेगाव तालुक्यातील अंजग येथील शेती महामंडळाच्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली उघडीस आलीय. यशवंत हिरे हे पशुखाद्य विक्रीचा व्यवसाय करीत असल्याने काल ते मुलाला सोबत घेऊन निघाले होते. अंजग येथे त्यांनी आपली गाडी लावली होती. अनेक तास गाडी उभी असल्याने परिसरातील स्थानिकांना संशय आल्याने त्यांनी विहिरीजवळ जाऊन पाहिले असता ही घटना उघडीस आली.

Malegaon News
Nashik News: राजस्थानमधून ८५ उंट कत्तलसाठी; पथकाकडून सुटका, दोन उंटाचा मृत्यू

आत्‍महत्‍येचे कारण अस्‍पष्‍ट

वडणेर- खकुर्डी पोलिसांना (Police) याची माहिती देण्यात आली. यानंतर त्यांनी अग्निशामक दलातील जवानांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. या प्रकरणी वडणेर- खकुर्डी पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. मात्र यशवंत हिरे यांच्‍या आत्‍महत्‍येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com